ओंकार हा फक्त एक ध्वनीच प्रतीक नाही हे संपूर्ण विश्व आहे

 ओंकार हा फक्त एक ध्वनीच प्रतीक नाही, हे संपूर्ण विश्व आहे.

 ( ओंकार )

ओंकार हा फक्त एक ध्वनीच प्रतीक नाही  हे संपूर्ण विश्व आहे

ओंकारः सरमंत्रणामुत्तम: परिकीर्तितः ।
ओंकारेण  प्लवैनैव संसाराब्धि तरिस्यसि ॥

 

सर्व मंत्रांमध्ये ओंकार उत्तम रीतीने ख्याति पावलेला आहे. ओंकाररूपी होडीनेच संसार-सागर तरू शकू.  

जगामध्ये जन्म घेणारा प्राणीमात्र मर्त्य आहे. मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवानी वेद-त्रयीचा आश्रय घेतला, “छद” -घातु आच्छादनार्थक आहे. देव वेदांच्या गुहेत लपले म्हणून वेदांना “ छन्दस्‌ ‘ अशी संज्ञा प्राप्त झाली. परंतु तेथेही मृत्यूने देवाचा पिच्छा केला तेव्हा देवानी ओंकाराचा आश्रय घेतला. हा ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले  दुरीम व अभेद्य स्थान. तेथे मृत्यूला प्रवेश मिळाला नाही, देव अमर झाले. ओंकाराचे हे सामर्थ्य ध्यानात घेऊन उपनिषदांच्या ऋषींनी माणसाला सल्ला दिला की, “ज्याला मृत्यूच्या भयापासून सुटायचे असेल त्याने ओंकाराची उपासना करावी, ओंकाराचा महिमा  उद्घोषित  करणारी ही आख्यायिका छांदोग्य उपनिषदात सांगण्यात आलेली आहे. ओंकार  म्हणजे वेदत्रयीचे सार. ओंकाराची विद्याही अक्षरविद्या आहे, अक्षर म्हणजे अविनाशी व अविनाशी म्हणजे परब्रह्म,। ओमित्येकाक्षरं ब्रह्म ‘ ह्या शब्दानी भगवंताने त्याचा महिमा वर्णन केला आहे. वेदांच्या उपासनेपासून फार फार तर स्वर मिळेल. पण ओंकाराच्या उपासनेपासून साक्षात अमृतत्वाची प्राप्ती होते,. 

ओंकाराचीच ‘ प्रणव ‘  ‘ उद्‌गीथ ‘ अशी दुसरी दोन नावे आहेत. ‘ नु ‘ घातूचा अर्थ आहे, स्तुती करणे. ह्या धातुला ‘ प्र ‘ उपसर्ग लावून  प्रणव ‘ शब्द बनला आहे, त्याचा अर्थ प्रकर्षरित्या केलेली स्तुती किंवा उत्तम स्तोत्र असा होऊ शकतो. उत्तम स्तोत्र परब्रम्हाची स्तुतीच असते. परब्रम्हाची स्तुती करताना सर्वच वाङ्मय अपुरे असल्याचे सिद्ध होते. तेथे शब्द-चापल्य कामाला  येत नाही. ‘ यतो वाचो निर्वतनते मनसा सह। ‘

ओंकाराचे दुसरे नाव ‘ उद्गीध ‘ आहे. “गै ‘ धातूचा अर्थ आहे  गाणे. ! त्याला  ‘ उत्‌ ‘ उपसर्ग लावून हा  शब्द बनवला आहे. त्याचा अर्थ देखील उच्च गीत किंवा उत्तम स्तुती असाच होतो. शब्द जेथे पोचत नाहीत अशा त्या परब्रम्हाचे उत्तम स्तवन करण्याच्या हेतूने ऋषींनी सर्व संकेत ज्याच्या साडेतीन मात्रामध्ये सामावले जातील अशा ओंकाराचा प्रयोग केला. ‘ तस्य वाचकः प्रणवः ‘  हा ध्वनी परब्रह्माचा वाचक बनला. छांदोग्य उपनिषदात अशीच एक दुसरी कथा आहे. देव व दानव ह्यांच्यात झालेल्या संग्रामात असुरांचा पराभव करण्यासाठी देवांनी ‘उद्गीथ’चा आश्रय घेतला, परंतु * उद्गीथ “चा स्पष्ट अर्थ ध्यानात न असल्यामुळे त्यांनी श्वाशोच्छ्वास, वाणी, डोळे, कान, मन वगैरेंची अनुक्रमाने ‘ उद्गीथ ‘समजून उपासना केली.  पण त्यात त्यांचे जमले नाही. असुरांनी इंद्रियांवर पापाचा मारा करताच नाक सुगंधाबरोबर दुर्गधही घेऊ लागले. डोळे शुभाबरोबर अशुभही पाहू लागले, कान न ऐकायचे तेही ऐकू चागले. वाणी सत्याबरोबर असत्यही बोलू  लागली आणि मन संकल्प- विकल्पात भटकू लागले. 

शेवटी देवांनी हृदयस्थ प्राणाची ‘ उद्गीथ ‘ रूपात  उपासना सुरू केली. त्याच्यावर केलेले  असुरांचे प्रहार निष्फळ ठरले  आणि शेवटी असुरांचा नाश झाला. ह्याप्रमाणे निःस्वार्थ रीत्या इंद्रियांचे रक्षण करणारा प्राण निष्पाप आहे आणि ‘प्रणव ‘ हे प्राणाचे प्रतीक आहे. माणसाच्या जीवनाला  आवश्यक अशी ऊब प्राणापासून मिळते व विश्वाच्या जीवनाला आवश्यक अशी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा  विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने पाहता अमृतत्वाच्या प्राप्तीची इच्छा  करणाऱ्याने प्राण व सूर्य ह्यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे.

छांदोग्य उपनिषदात एक मूलभूत दांपत्याची कल्पना आहे. हे दांपत्य वाणी व  प्राणाचेच आहे आणि दोहोंचे मिलन ओंकारातच होते. वाणी व प्राण ह्यांच्या विशिष्ट संयोगानेच ओंकाराचा उच्चार होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर ओंकाररूपी बालकाला जन्म देऊन वाणी व प्राण ह्यांचे दाम्पत्य-जीवन कृतार्थ  बनले, बृहस्पतीने देखील त्याची  उद्‌गीथ ‘ रूपाने उपासना केली  आहे. ‘बृहत’  म्हणजे वाणी आणि तिचा “पति म्हणजे, “ प्राण. ‘ वेदांमधील तो बृहस्पती तोच पुराणातील ‘गणपती’.

 साडेतीन अक्षरांचा बनलेला आहे. त्यातील पहिली मात्रा “अ’कार आहे. दुसरी मात्रा ‘ उ ‘कार आहे, तिसरी मात्रा “म ‘कार आहे. आणखी अर्धी मात्रा हे सर्व मिळून असा ओंकार  झालेला आहे. प्रत्येक मात्रा भिन्न भिन्न  क्षेत्रातून वेगळे वेगळे सुचवते. जर सृष्टीच्या व्यापकतेचा  विचार केला तर “अ ‘कार ह्या पहिल्या मात्रेत पृथ्वी व्यापक आहे, ‘उ’ कारात अंतरिक्ष आणि “म ‘कारात देवलोक व्याप्त आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय ह्यांचा विचार केला तर ‘अ ‘कार हा उप्पत्ती सूचक आहे, ‘उ ‘कार हा स्थिती सूचक आहे व “प्र ‘कार हा लायचे सूचक आहे. 

जीवात्माच्या तीन स्थितीत विश्व, तेजस्‌, आणि प्राज्ञ ही अनुक्रमें “अ कार, “उ ‘कार आणि ‘म ‘कार ह्यांनीच व्याप्त होतात, ओंकारात “अ ‘कारावर भर दिला तर अधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते, ‘उ कारा – वरचा भर आधिदैविक  सामर्थ्याचे सूचक आहे आणि तिसरी मात्रा “म “कारावर ध्यान केंद्रित करण्यात आले तर ब्रम्हाच्या  साक्षातकारात साहाय्यभूत होते. त्याच्याद्वारे जीवनाची सार्थकता साधता येते. जीवन अमृतमय बनते. 

ह्या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहे. इंद्रियांकडून होणारी कर्मे, मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे, ह्या तीनही कर्मांना  कार प्रभावी व तेजस्वी बनवतो.  अर्थात्‌ मानवाने त्याचा अंतरबाह्य योग्य रीतीने विनियोग करणे आवश्यक आहे.

शेवटी राहिली अर्धी मात्रा. ही मागील  तिन्ही मात्रा-‘अ ‘कार, “उ कार व “म कार ह्यांच्या सहयोगाची सूचक आहे. ती भूतमात्र प्रत्येकाची सहिष्णुता व  सर्वव्यापी भगवत्‌ तत्त्वाची सूचना देते. तेजस्वी व पाप-पुण्यापासून अलिप्त अशा शांत आत्म्याचे ती प्रतीक आहे.

ब्रह्मवादी लोकांच्या यज्ञ, दान, तप इत्यादि क्रिया ओंकाराचा उच्चार करूनच सुरू होतात, असे भगबान अर्जुनाला  सांगतात,

तस्मादोभित्युदाह्रत  यज्ञदानतपः क्रिया: ।

प्रवर्तन्ते  विघानोक्ताः सततं ब्रम्हवादिनाम्‌ ॥ ‘

वेदमंत्र  कारपूर्वकच उच्चारले जातात. ओंकाराशिवाय वैदिक मंत्र लंगडे गणले जातात, ओंकारपूर्वक केलेली कोणतीही कर्मे सात्विक बनतात.  कार हा कर्माच्या प्रारंभात, अंधारात दीपक किंवा  वाळवंटात वाट दाखविणाऱ्या माहितगारासारखा आहे. आरंभलेल्या कामाला शेवटपर्यंत पोचविण्यात तो मदत करतो. एवढेच नाही तर कर्मात असलेले दोषदेखील तो दूर करतो. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी ऋषीनी एक युक्ती शोधून काढली आणि ती युक्ती आहे ओंकाराची. कर्माच्या आरंभात “ तत्सत्’ म्हटल्यानंतर यज्ञ, दान इत्यादि कर्मे बाधक न बनता मोक्षदायके बनतात. 

कार बिन्दु सयुंक्तम   नित्यं ध्यायन्ति योगिनः।

कामदं मोक्षदं चैव  काराय  नमो नमः| “

समग्र  विश्व  कारात सामावले जाते. इच्छासिद्धी व मोक्षप्राप्ती सर्वच ज्यात  समाविष्ट होते, अशा  काराचे योगीजन सतत ध्यान करतात.

काराची उपासना करण्यासाठी योग्य अधिकार असला पाहिजे. दृश्य किं श्राव्य जगाच्या विषयासाठी संपूर्ण विरक्ती निर्माण होत नाही तोंपर्यंत काराची उपासना करणे हा अनधिकारी प्रयत्न आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा चेराग्यम्‌ । ( योगसूत्र ) ज्याने जीवनात दंद्वामध्ये संतुलन ठेवण्याचे शिक्षण घेतले आहे, ज्याची वृत्ती अनासक्त बनली आहे, वैराग्यमय बनली आहे तोच काराच्या उपासनेचा अधिकारी गणला जातो. कार उच्चारण्यातील काही शारीरिक लाभ ध्यानात घेऊनही तो उपास्य म्हणून सार्वजनिक होऊ शकत नाही. म्हणून तशा लोकांना काराचा जप करायळा न सांगता सगुण-साकार भगवंताची उपासना समजावली पाहिजे. आणि म्हणूनच सामान्य लोकात केवळ चा जप न करता हरि नमः शिवाय किंवा  नमो भगवते वासुदेवाय वगैरेचा  जप करण्याची पद्धती आहे. जुन्या काळात तर फक्त खऱ्या अर्थाने संन्यासी झालेले लोकच चा जप करीत होते. 

 हे अनुभूतीसूचक प्रतीक आहे. ते ओंकाराचे सूचक आहे आणि म्हणून  द्वारा प्राप्त होणाऱ्या उत्तरात आपल्या वृत्तीचे प्रप्रतिबिंब पडते. तसाच आपल्या विचारांचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. आपण जर विचारले :  भगवान आहे का ‘ तर “  उत्तर देईल, ‘ होय आहेच ! ‘ ‘ भगवान  आपल्याला  भेटेल का! ‘ “  ‘ सांगेल; ‘ हां; भेटेलच ! ‘ ‘ भगवान भेटणे कठीण आहे का? ‘  सांगेल  : ‘ हो; कठीण आहे. ‘ ह्याप्रमाणे निराश झालेल्याला तो हिम्मत देतो आणि उताविळ बनलेल्याना साधना व  तपश्‍चर्या ह्यांचे महत्व समजावतो.  कार आपल्याला वेडा आशावाद व दुर्बल निराशावाद ह्यांच्यात संतुलन ठेवायला  शिकवतो.

सारांश, कार परब्रह्माचे प्रतीक आहे. ब्रह्मविदयेचा समग्र अर्थ  कारात संकलीत झालेला आहे. म्हणून तीन मंत्रांनी समग्र सृष्टीला सामावून घेतो, तर शेष उरलेल्या अर्ध्या मात्रेने सृष्टिकार्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. तो आसक्तीचे भरतवाक्य आहे आणि अनासक्तीची नांदी आहे. तो प्राण, वेद व परब्रह्म ह्यांचे तेजःपुंज असे प्रतीक आहे. काराला जर त्याच्या खऱ्या अर्थात आत्मसात करून घेतले  तर विश्वंभर स्वतः आपल्या हृदयांगणात येऊन खेळू लागेल. म्हणूनच उपनिषदांनी उद्घोष केला आहे की, 

 ओंकारप्रभवा देवा आओंकारप्रभवाः स्वरा: ।

 ओंकोरप्रभवं सर्व त्रेलोक्यं सचराचरमू ॥

*****

(पुढील लेखात  आपण “कमळ” या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया….)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक 

Leave a Reply

Your email address will not be published.