पाषाणयुगीन महाराष्ट्र

पाषाणयुगीन महाराष्ट्र

पाषाणयुगीन महाराष्ट्र

महाराष्ट्रालादगडांचा देश’ असे कवीने नाव दिलेले आहे आणि ते महाराष्ट्राची भूरचना लक्षात घेता यथार्थही आहे. त्यामुळेच कदाचित पाषाणयुगीन मानव महाराष्ट्राकडे आकृष्ट झाला असावा. कोकणपट्टी सोडली तर महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामध्ये पाषाणयुगाच्या विविध कालखंडाची दगडाची बनवलेली निरनिराळ्या प्रकारची हत्यारे विपुल प्रमाणात सापडली आहेत

पाषाणयुगीन महाराष्ट्र
                                  पाषाणयुगीन महाराष्ट्र

पाषाणयुगीन मानव किंवा त्याचे अस्तित्व दाखविणारा इतर पुरावा मिळविण्याच्या दृष्टीने जवळजवळ सव्वाशे वर्षापासून निरनिराळ्या संशोधकांनी प्रयल केल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने पाहता पाषाणयुगाचा पहिला पुरावा १८६३ साली मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी असलेल्या मुंगीपैठण येथे वायने  यांना सापडला. या ठिकाणी त्यांना ‘अकीक’ वर्गाच्या पाषाणाच्या छिलक्यापासून केलेले एक हत्यार गोदावरीकाठच्या थरांच्या छेदामध्ये आढळून आले. सुमारे सात सें. मी. लांब आणि अडीच सें. मी. रूंद असलेले हे हत्यार काहीसे वक्र असून त्याचे एक टोक बहिर्वक्र होते, दुसरे टोक काहीसे दांड्याच्या स्वरूपातले असून हे हत्यार हाडाच्या किंवा लाकडाच्या तुकड्यात बसवून त्याचा चाकूसारखा उपयोग केला जात असावा, असे वायने यांनी मत मांडले आहे. अर्थात सुरूवातीच्या मतामध्ये नंतरच्या काळामध्ये झालेल्या विस्तृत संशोधनामुळे बदल करणे अपरिहार्य ठरले.

या शोधाने संशोधनाला फारशी चालना दिल्याचे दिसून येत नाही, कारण या क्षेत्रातला दुसरा शोध लागण्यासाठी जवळजवळ चोळीस वर्षांचा अवधी जावा लागला. हा दुसरा शोध १९०४ साली पैठणजवळ गोदावरीकाठी – घट्ट वाळूच्या थरात जंगली हत्तीचे (एलेफस नॅमॅडिकस) अश्मीभूत झालेले अवशेष सापडले. हा हत्ती महाकाय स्वरूपाचा असावा हे, या हत्तीचा जो अश्मीभूत सुळा सापडला त्याचा परीघ १४५ सें. मी. होता यावरून स्पष्ट झाले. याच वर्षी आणखी एका पुराव्याचा शोध महत्वपूर्ण ठरला.

 
पैनगंगेच्याकाठी अश्मीभूत झालेली प्राचीन जनावरांची हाडे सापडली. याचवेळी भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण खात्यामधील पिलग्निम यांना नाशिक जिल्ह्यातील नांदूर – मधमेश्‍वर येथे हत्ती आणि पाणघोड्याची अश्मीभूत स्वरूपातील हाडे उपलब्ध झाली. हाही हत्ती प्रचंड स्वरूपाचा असावा हे सुळ्याच्या १२५ सें.मी. परीघावरून सिद्ध झाले. नांदूरमधमेश्‍वरचा हत्ती आणि पैठण येथे सापडलेला हत्ती आकाराने एकाच वर्गाचे असावेत असे सूचित केले गेले. पिलग्निम यांच्या मते या हत्तीची उंची सुमारे ५ मीटर असावी. हा हत्ती एलेफस अँन्टीकस (नॅमॅडिकस) या वर्गांचा असावा असे मत पिलग्निम यांनी व्यक्‍त केले. त्यांनी या हत्तीचे मूळ युरोपमध्ये शोधले. नर्मदाकाठी सापडलेल्या अश्मीभूत पुराव्यानुसार या हत्तीचा काळ पुर्व – प्लायस्टोसीन ‘ असावा असेही मत त्यांनी व्यक्‍त केले. गोदावरीकाठी सापडलेली पाषाणाची हत्यारे आणि नामशेष झालेल्या प्राणीवर्गाची अश्मीभूत हाडे यावरून महाराष्ट्रामध्ये प्राचीन अश्मयुगामध्ये मानवाचेही अस्तित्व असावे, असे अनुमान करता आले.
पाषाणयुगीन महाराष्ट्र
पाषाणयुगीन महाराष्ट्र
 
या शोधांनी पाषाणयुगीन महाराष्ट्रावद्दल नवीन माहिती उपलब्ध केली तरी पाषाणयुगीन संशोधनाला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. मात्र $९४० पासून गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रामध्ये पाषाणयुगीन मानवी जीवनावद्दल त्याचप्रमाणे पुरापर्यावरणावद्दल विस्तृत पुरावा शोधण्याचे श्रेय प्रामुख्याने प्रा. सांकलिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले पाहिजे. गेल्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये लहानमोठ्या नद्यांच्या काठी आणि काठाच्या परिसरामध्ये पाषाणयुगाची शेकडो हत्यारे त्याचप्रमाणे नामशेष झालेल्या प्राण्यांची अश्मीभूत हाडे सापडली आहेत. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी अशी हत्यारे पाषाणयुगीन मानव बनवीत होता अशीही काही कार्यशाळांची (वर्क शॉप) स्थले सापडली आहेत. तापी, गोदावरी, प्रवरा, भीमा, मुळा, घोड,कृष्णा, पूर्णा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, कन्हान, मांजरा इत्यादी नद्यांच्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या तसेच काही प्राचीन नाल्यामध्ये पाषाणयुगीन हत्यारे फार मोठ्या प्रमाणावर सापडलेली आहेत. यामुळे असे म्हणता येते की कोकण विभागः वगळता महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा उपलब्ध झालेला आहे. 
 
महाराष्ट्रातील पाषाणयुगाचे कालखंड वर्गीकृत करण्याच्या दृष्टीने १९३९ साली मुंबईजवळ कांदीवली येथे टॉड यांनी केलेले काम आणि त्यामध्ये प्रा. सांकलियांनी अव्याहतपणे घातलेली भर यामुळे पाषाणयुगाचे निरनिराळे खंड करण्यात आले आणि ते आता पाषाणयुगाच्या अभ्यासात रूढ झाले आहेत. याचे विवेचन करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणे जरूर आहे, ती ही की पाषाणयुगाच्या मानवाची हत्यारे फार मोठ्या संख्येने वरवर पृष्ठसंशोधनामध्ये सापडली आहेत. मात्र जी काही स्तरीय संदर्भामध्ये यथार्थजागी मिळालेली आहेत त्यामुळे या वर्गीकरणाला शास्त्रीय बैठक प्राप्त झाली आहे.तेथ पासूनूचा काळ इतिहासामध्ये जमा होतो. याआधीचा सगळा काळ स्थूलमानाने प्रागितिहासामध्ये समाविष्ट होत असला तरी प्रागितिहासामध्ये बहुतांशी पाषाण अथवा अश्मयुगीन कालखंडांचा अंतर्भाव होतो. या कालखंडाची कालमर्यादा इतिहासकालाच्या कितीतरी पट मोठी आहे.
 
भारतापुरते बोलावयाचे झाल्यास या युगाची कालदृष्ट्या व्याप्ती १ लक्ष ते  १० हजार वर्षे (सध्यापासून मागे) अशी स्थूलमानाने मांडली गेली आहे. पाषाणयुगाचा अभ्यास भूवैज्ञानिकांनी मांडलेल्या कालखंडाशी निगडीत आहे.या पाषाणयुगातील मानवी जीवनावर ‘प्लायस्टोसीन’ कालखंडात झालेली ‘हिमयुगे’ आणि त्यांचा हवामान आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या बदलाचा प्रभाव पडला. अर्थात अशातर्‍हेचे निष्कर्ष युरोपखंडाशी जास्त निगडीत आहेत. ‘हिमयुगे’ आणि त्यांच्याशी संबध असलेल्या घटनांचा भारताशी कितपत संबंध आला याबद्दल निरनिराळ्या विद्दानात एकमत नाही.
 
काहींच्या मते काश्मीरसारख्या प्रदेशात या प्रकारचा पुरावा सापडतो.महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास अशातऱहेच्या घटनांचा महाराष्ट्राच्या भूप्रदेशाशी संबंध आला असावा, असे समजणे धाडसाचे ठरेल.अश्मयुगाचा पुरावा भारतात आणि महाराष्ट्रात तत्कालीन मानवाने वापरलेल्या हत्यारांच्या रूपात आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या पण आता नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत हाडांच्या स्वरूपात मिळतो. महाराष्ट्रातही अशा तऱ्हेचा पुरावा उपलब्ध झाल्याचे त्याआधी उल्लेखले आहे.
 

पाषाणयुगीन महाराष्ट्र – पाषाणयुगाचे तीन प्रमुख खंड पाडले जातात –

 
१) पाषाणयुगीन महाराष्ट्र – पुराश्मयुग (Paleolithic)
 
२) पाषाणयुगीन महाराष्ट्र – मध्याश्मयुग ( Mesolithic)
 
३) पाषाणयुगीन महाराष्ट्र  – नवाश्मयुग ( Neolithic )

यातील पूर्व-पुराश्मयुगाची प्राचीनत्व कार्बन – १४ त्याचप्रमाणे युरेनियमथोरियम आयसोटोप पद्धतीचा वापर करून सुमारे १ लक्ष २० हजार वर्षांहूनही प्राचीन असावी असे सिद्ध करता आले आहे. महाराष्ट्रातही अशा तर्‍हेचे शास्त्रीय कालमापन करण्यात आलेले आहे, त्याचा उल्लेख योग्य संदर्भात पुढे करण्यात येईल. महाराष्ट्रात बहुतेक सर्व नद्यांच्या परिसरात पाषाणथुगाच्या विविध कालखंडातील हत्यारे सापडलेली आहेत. नवाश्मयुगाचा अंतर्भाव तांत्रिकदृष्ट्या पाषाणयुगात केला असला तरी या कालातील मानवी जीवन स्थिर होऊन पशुपालन आणि अनोोत्पादन या वैशिष्ट्यांमुळे पुरापाषाणयुगापासून हा कालखंड सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा आहे. लेखनाचा अभाव आणि दगडी हत्यारांचा वापर यामुळेच या कालखंडाला ‘नवाश्मयुग’  असे नाव दिले गेले आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ नवाश्मयुगाचे विशुध्द स्वरूपाचे स्थल अजून उपलब्ध नाही.

 

पाषाणयुगीन महाराष्ट्रपूर्व – पुराशमयुग ( लोअर पॅलिओलिथिक )

 या कालखंडाशी निगडीत दगडाची हत्यारे महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या नद्यांच्या परिसरामध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये सापडली आहेत. या कालखंडाचे ‘ अथवा त्यातील हत्यारांचे वर्णन करण्याआधी एक बाब  स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याआधी उल्लेखिलेले पाषाणयुगाचे कालखंड म्हणजे एकमेकांशी संबंध नसलेले बंद कप्पे आहेत असे मात्र नाही.
 

हत्यार बनविण्याच्या तंत्रामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या आकारात आणि प्रकारात बदल आढळून येत असला तरी पुराश्मयुगातील विशिष्ट कालखंडातील हत्यारे एकदम उपयोगातून पार गेली आणि नव्या तर्‍हेची हत्यारे निर्माण झाली अशा तर्‍हेचा समज करून घेणे वरोवर ठरणार नाही. पाषाणयुगातील हत्यारे प्रामुख्याने दोन वर्गाची आढळतात. यातील पहिला प्रकार मूळ गोट्यावर प्रक्रिया करून वनविलेली दगडगोट्यांची हत्यारे आणि दुसरा प्रकार म्हणजे गोट्यांचे .छिलके काढून त्या छिलक्यापासून वनविलेली हत्यारे. या दोन्ही प्रकारची हत्यारे महाराष्ट्रात सापडली आहेत. महाराष्ट्राच्या पाषाणयुगाचा अभ्यास, महाराष्ट्राचा अलग विचार करून करता येणे चूक ठरते. महाराष्ट्रात सापडलेली हत्यारे इतर प्रदेशातील नद्यांच्या परिसरात सापडलेल्या हत्यारांशी मिळतीजुळती आहेत.

पाषाणयुगीन कालखंडाचा अभ्यास करताना एक बाव लक्षात घेणे आवश्यक आहे. ही बाब महाराष्ट्रालाही लागू आहे. भारतापेक्षा कितीतरी आधी पाषाणयुगाचा शोध आणि अभ्यास युरोपमध्ये सुरू केला गेल्याने त्या संदर्भात युरोपमध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आणि तंत्र – वैशिष्ट्यांची नावे भारतातही अशा अभ्यासामध्ये उपयोगात आणली गेली. त्यामुळे त्यांचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. अर्थात अलीकडे यावद्दल विचारमंथन सुरू झाले आहे. १८६३ साली तामिळनाडूतील पल्लावरम येथे रॉवर्ट व्रुस फूट यांना भारतात पहिल्याप्रथम पाषाणयुगीन हत्याराचा शोध लागला. याआधीही युरोपमध्ये पाषाणयुगाची हत्यारे सापडली असल्याने .फूट आणि त्यांच्या नंतरच्या संशोधकांनी युरोपात असलेल्या संज्ञा वापरल्या यात नवल नाही.किंवहुना आजही त्याच संज्ञा पाषाणयुगाच्या संदर्भात प्रचलित आहेत.

यादृष्टीने पाषाणयुगाचा महाराष्ट्रातील आढावा घेताना अशा संज्ञाचा वापर करून घेणे अपरिहार्य झालेले आहे.महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीतील कुलावा आणि रत्नागिरी  हे प्रदेश सोडल्यास जवळपास सर्व नद्यांच्या खोऱ्यात पूर्व – पुराश्मयुगाचा ( अर्ली / लोअर पॅलिओलिथिक ) हत्यारांच्या रूपामध्ये पुरावा सापडलेला आहे. विशेषतः नाशिकजवळ गोदावरीकाठचे गंगापूर, अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाजवळील चिरकी – नाला, मुळा-मुठेच्या काठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजचा परिसर व दत्तवाडी विभाग आणि धुळे जिल्ह्यातील धावरापाडा ही या दृष्टीने महत्वाची स्थळे ठरलेली आहेत. चिरकी – नाला या ठिकाणी या कालखंडातील हातकुऱ्हाड, फरश्या, तासण्या आणि तोडहत्यारे, ही या कालाच्या मानवी जीवनाची निदर्शक दगडी हत्यारे, ‘स्वस्थानी’ सापडली. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ही हत्यारे नदीच्या प्रवाहातून. दुसरीकडून येऊन ती येथे पडली असे नव्हे. याचाच अर्थ याठिकाणी पूर्व – पुरामयुगाचा मानव काही काळ तरी वास्तव्य करून होता असे सूचित होते.

पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या परिसरामध्ये अशा प्रकारची वनविलेली हत्यारे आणि त्याचबरोबर हत्यारांच्या बनावटीत उपयोगी ठरतील असे मोठे गोटे सापडले. हा पुरावा ट्रॅप या खडकामध्ये जी दुसऱ्या प्रकारची धमनी (डाईक ) डेक्कन कॉलेजच्या  परिसरामध्ये आहे तिच्या शेजारीच मिळाला. यावरून पूर्व – पुराशमयुगीन मानव या भागामध्ये काही काळ राहात असून त्याने आपल्या वास्तव्यामध्ये ही हत्यारे बनविली, असे स्पष्ट दिसून येते; कारण मोठमोठे छिलके काढलेले गोटेही “या स्थळी सापडलेले आहेत. अशाच प्रकारचा कार्यशाळेचा (वर्कशॉप ) पुरावा धुळे जिल्ह्यातही उपलब्ध झालेला आहे. हत्यारांचे प्रकार आणि महाराष्ट्रामध्ये या कालखंडातील निक्षेपात नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत अवशेषांचा आढळ यावरून महाराष्ट्रातील पूर्व – पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सुमारे एक ते दीड लाख वर्षपूर्व असावे असे तीलनिकदृष्ट्या अनुमानित केले गेले आहे.

पूर्व – पुराश्मयुगीन हत्यारे सर्वसामान्यपणे तीन – चार प्रकारची आढळून आली आहेत. ( फलक ३) त्यातील पहिला प्रकार फरशीसारख्या आकाराच्या हत्याराचा आहे. त्याला इंग्रजीमध्ये ‘क्लीव्हर असे नाव दिले आहे. हे हत्यार बहुतांशी मोठ्या आकाराच्या गोट्यापासून काढलेल्या छिलक्यावर संस्करण करून बनवीत असत. याची एक बाजू रूंद, धारदार, सरळ असून धारेच्या विरूध्द बाजूचा भाग जाडसर, हातात पकडता येण्यासारखा केलेला असतो.

रूंद धारदार कड कठीण वस्तू – कच्चे मांस अथवा हाडे – तोडण्यासाठी वापरली जात असे. काही वेळा मोठ्या आकाराचा झाडझाडोरा तोडण्यासाठीही अशा, लोखंडी कुऱ्हाडीसारख्या दिसणाऱ्या, दगडी फरशांचा वापर करण्यात येत असावा. दुसऱ्या प्रकाराच्या हत्याराला हातकुऱ्हाड – ‘हॅण्ड अँक्स ‘ – असे , नाव दिलेले आहे. दिलेल्या नावावरून या हत्याराचा उपयोग हातात धरून कुऱ्हाडीसारखा केला जात असावा असा समज होतो, परंतु फरशी आणि कुऱ्हाड यांच्यामध्ये फरक आहे. या “ हातकुऱ्हाडी ‘ एका बाजूला टोकदार तर दुसर्‍या बाजूला जाड, फुगीर आणि रूंद असतात. आकाराने यात काही प्रकार आढळून .येत असले तरी ही हत्यारे लंवगोल किंवा लंबत्रिकोण या आकाराची सर्वसाधारणपणे आढळून येतात. टोकदार बाजू आणि खटूंद – काहीशी बहिर्गोल – विरूध्द बाजू, या व्यतिरिक्त असलेल्या दोन कडावरही लहानलहान छिलके काढून या दोन्ही बाजू काहीशा नागमोडी आणि धारदार करीत असत.

कातडी फाडणे अथवा जमीन खणणे यासाठी या हातकुऱ्हाडींचा वापर केला जात असावा असा समज आहे. तिसऱ्या प्रकारचे हत्यार “तोड-हत्यार’ ( चॉपर) या नावाने ओळखले जाते. हे प्रामुख्याने चपट्या गोट्यापासूनं केलेले असून त्याच्या कडा छिलके काढून अर्धगोलाकृती बनविल्या जात.

शिकार केलेल्या जनावराच्या मांसाचे लहानलहान तुकडे करण्यासाठीं याचा वापर करण्यात येत असावा, असा अंदाज केला गेला आहे.

महाराष्ट्राचा बराच, विशेषतः पठाराचा, भाग ‘बसाल्ट’ या प्रकारच्या खडकांनी व्यापलेला आहे. या दगडाचा पोत फारसा चांगला नसल्याने याच्यावर जसे पाहिजे तसे छिलके काढून संस्कार करता येत नाहीत. इतर प्रदेशात ज्याप्रमाणे ‘क्वार्टझाईट’ या उत्तम प्रतीच्या दगडाचा आढळ होतो, तसा महाराष्ट्रात फारसा होत नाही. म्हणून ‘बसाल्ट’ खडकामध्ये ज्या उत्तम पोताच्या दगडांचा धमन्या किंवा ‘कारी’ महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग हत्यार बनावटीमध्ये मानवाने केला.ही हत्यारे बनविणारा मानव कसा होता हे सांगणे शक्‍य होत नाही.

कारण या कालातील वर उल्लेखिलेली हत्यारे शेकड्यांच्या संख्येने उपलब्ध असली तरी ज्या मानवाने ही बनविली आणि वापरली त्याचे कोणत्याही स्थितीतले अवशेष अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे त्याचे केवळ अस्तित्व जाणवते. परंतु हा मानव तोडणे, फोडणे, घासणे इत्यादी कामांना उपयुक्त ठरतील अशी हत्यारे बनविण्यात वाकवगार होता यात शंका नाही.

पुरापर्यावरण शास्त्रज्ञांनी या कालखंडातील हवामानावद्दल असे मत दिले आहे की या कालखंडात महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बरेच होते, झाडझाडोरा विपुल होता आणि हवेमध्ये आर्द्रता जास्त होती. या कालातील नद्यांची पात्रे विस्तृत असून त्यामध्ये खूप दगडगोटे होते. या दगडगोट्यापासूनच या कालातील मानवाने हत्यारे तयार केली. ही हत्यारे गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या प्रदेशात सापडलेल्या समकालीन हत्याराप्रमाणेच आहेत.

पूर्व-पुराश्‍्मयुगात हत्यार बनावटीची स्थूलमानाने दोन तंत्रे आढळून येतात. यातील एक ‘अँबीव्हीलियन’ या नावाने ओळखले जाते. फ्रान्समध्ये सोम नदीच्या काठी असलेल्या ‘अँवीव्हिले’ या गावी ओबडधोबड हातकुऱ्हाडी प्रथम सापडल्याने या गावाचे नाव या तंत्राला देण्यात आले.

यामध्ये हत्यार बनविण्याकरिता काढलेले छिलके काहीसे मोठे आणि अनियंत्रित असतात. दुसऱ्या प्रकारचे तंत्र ‘अँश्युलियन’ या नावाने ओळखले जाते. अशाप्रकारची हत्यारे फ्रान्समध्ये सॉ-अश्यूल याठिकाणी सापडल्याने हे स्थलनाम या तंत्राला किंवा या तंत्राने वनविलेल्या हत्यार-वर्गाला दिले जाते.

यामध्ये अगदी पातळ आणि लहानलहान छिलके काढून हत्यार कलात्मक केल्याचे दिसून येते. असे छिलके लाकूड, हाड किंवा सांबरशिंगाच्या साहाय्याने काढले जात. यातील काही छिलके तर माश्याच्या खवल्या इतके पातळ आणि लहान असतात. तंत्रदृष्ट्या या दोन प्रकारात फरक आहे.

‘अँश्युलियन ‘ तंत्राची नगर जिल्ह्यातील नेवासे येथे सापडलेली हातकुऱ्हाड प्रख्यात आहे.पूर्व-पुराशमयुगाचा काल निश्‍चित करणे अवघड आहे. परंतु सर्वसाधारणपणे दीड लाख ते पन्नास हजार वर्षपूर्व असा तो मानला जातो.

 

पाषाणयुगीन महाराष्ट्र – मध्य – पुराश्‍मयुग (मिडल पॅलिओलिथिक )

पूर्व-पुराश्‍मयुगाचा शेवट, हवामानात झालेल्या वदलामुळे झाला असावा, असे पुरापर्यावरणशास्त्रज्ञांचे मत आहे. या नंतरच्या काळातील हत्यारांमध्ये बदल घडून आल्याचे दिसून येते. अर्थात याचा अर्थ पूर्व-पुराशमयुगातील सर्व हत्यारांचा किंवा तंत्राचा वापर पूर्णपणे थांवला असे मात्र नव्हे. उदाहरणार्थ, * अँश्युलियन ‘ तंत्राने सुवक आणि कलात्मक बनविलेल्या परंतु लहान आकाराच्या हातकुऱ्हाडी या कालामध्येही वापरात होत्या. मात्र या कालखंडामध्ये हत्यारांच्या वनावटीसाठी उत्कृष्ट पोताचा जास्पर वगैरे सारखा . दगड वापरण्यात आला. हत्यारांचे आकार खूपच लहान झाले, हत्यार. निर्माण करण्याच्या तंत्रामध्ये वदल झाला आणि छोट्या तासण्या,* गिरमिटे आणि वाणाग्रे यांच्यासारख्या हत्यारांची निर्मिती झाली. 

या हत्यारांचा शोध महाराष्ट्रामध्ये प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील प्रवराकाठी नेवाश्याच्या परिसरामध्ये १९५४ साली लागला. त्यावेळी त्यांना *वर्ग-२’ ची हत्यारे ( सिरीज-टू) असे नाव दिले गेले. परंतु त्यानंतर

झालेल्या विस्तृत पाहाणीमध्ये या वर्गाच्या हत्यारांचा आढळ अनेक ठिकाणी नदीच्या काठच्या स्तरीय संदर्भात झाल्याने, या वर्गाच्या हत्यारांची उत्कांती (७५०॥७॥७॥) आणि त्यांचे स्तरसंवध्दस्थान ( आतटात॥10 ७९५) याबद्दल निश्‍चिती झाली व त्यांना ‘मध्य-पुराश्मयुगीन’ असे नाव रूढ झाले आहे. प्रव्राकाठी प्रथम सापडलेल्या या हत्यारांचा आढळ आता महाराष्ट्रामध्ये तापी, गिरणा, वर्धा, पूर्णा, वैनगंगा, मांजरा, भीमा, घोड, कृष्णा, गोदावरी व त्यांच्या अनेक उपनद्यांच्या परिसरामध्ये झाला आहे. मुंबई जवळ कांदिवली-वोरीवली येथेही ही मिळालेली आहेत.

वर उल्लेखिल्याप्रमाणे या कालखंडातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने तासण्या, गिरमीटे, वाणाग्रे आणि भोके पाडण्यासाठी वनविलेले टोकदार टोचे सापडतात. ही आकाराने लहान तर आहेतच परंतु त्यांच्यावरील काढलेले छिलके अत्यंत वारीकवारीक आहेत. पूर्व-पुराश्‍्मयुगाच्या वनावटीमध्ये “बसाल्ट’ आणि डोलेराईट’ यांचा वापर होत होता, परंतु मध्य – पुराश्मयुगाच्या हत्यारांसाठी जास्पर, चर्ट, कार्नेलियन, अँगेट, व्लडस्टोन इत्यादी उत्कृष्ट पोताच्या दगडाचा वापर केला जाई. दक्खनच्या कातळामध्ये वर उल्लेखिलेल्या दगडांच्या ‘धमन्या’ आढळून येतात. त्यांचाच वापर या हत्यारांच्या बनावटीमध्ये केलेला आहे. याप्रकारचे दगड मूलतः लहान आकारात उपलब्ध असल्याने हत्यारांचे आकार लहान असणे अपरिहार्य होते. या हत्यार निर्मितीच्या काही जागाही महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या आहेत. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील पेठणगुंजाळे आणि नागपूर जिल्ल्यातील कोराडी या उल्लेखनीय आहेत. औरंगावाद जिल्ह्यातील वाघोडी-वडोळी येथे या कालखंडातील मानवाचे काही काळ तरी वास्तव्य असावे, असा पुरावा उपलब्ध झालेला आहे.

या हत्यारांच्या तंत्रामध्ये एक नाविन्य आढळून येते. ही हत्यारे सपाट परंतु काहीशा टोकदार गोट्यापासून केलेली आढळतात. गाभ्यापासून छिलका काढण्याच्या आधी वरीच प्रक्रिया करून योग्य असा पातळ छिलका काढला जाई आणि अशा छिलक्यावर संस्करण करून त्यापासून वर उल्लेखिलेली हत्यारे बनविली जात. दुसरे असे की पूर्व – पुराश्‍्मयुगाची हत्यारे घट्ट झालेल्या मोठ्या दगडगोट्यांच्या थरामध्ये आढळतात, तर मध्य – पुराश्मयुगातील हत्यारे जाड्याभरड्या वाळूच्या आणि लहान गोट्यांच्या घट्ट झालेल्या थरामध्ये आढळतात. याचा अर्थ या काळी पर्जन्यमान वाढले तरी ते पूर्व – पुराश्मयुगाइतके नव्हते.

हत्यारांच्या प्रकारावरून असे अनुमान करता येते की ही हत्यारे कातड्यात भोके पाडण्यासाठी त्याचप्रमाणे लाकूड अथवा हाड तासण्यासाठी वापरली जात असावीत. वाणाग्रांचा वापर शिकारीसाठी केला जात असला पाहिजे. या कालातील मानवाचे अवशेष कुठल्याही स्वरूपामध्ये अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. परंतु रानटी वैलाची अश्मीभूत झालेली हाडे गोदावरीकाठी काळेगाव आणि गंगापूर, ‘घोडकाठी इनामगाव, प्रवराकाठी नेवासे, येथे त्याचप्रमाणे वर्धा आणि पूर्णा या विदर्भातील नद्यांच्या आणि मराठवाड्यातील मांजरा नदीच्या परिसरातही सापडली आहेत.या कालखंडाची कालमर्यादा सर्वसाधारणपणे सुमारे ४० ते २० हजार वर्षपूर्वी अशी अनुमानित करण्यात आलेली आहे.

पाषाणयुगीन महाराष्ट्र – उत्तर – पुराश्मयुग ( अपर पॉलिओलिथिक )

पातळ छिलक्यापासून हत्यारे बनविण्याचे तंत्र आणि कौशल्य मध्य – पुराश्‍्मयुगीन मानवाने आत्मसात केले होते याचा उल्लेख वर आला आहे. उत्तर – पुराश्मयुगात या तंत्रामध्ये आणखी प्रगती झाली. या ‘कालाचे वैशिष्ट्य म्हणजे , चाल्सीडोनी, अँगेट, कार्नेलियनसारख्या उत्तम पोताच्या दगडापासून समांतर बाजू असलेली पाती, त्याचप्रमाणे एका विशिष्ट तर्‍हेने (काटकोनात) छिलका काढून कोरण्यासाठी कोरके (ब्यूरीन ) तयार करण्याची. प्रथा रूढ झाली. त्यामुळे या कालखंडातील गारगोटीच्या छिलक्यांच्या हत्यारांना ‘ब्लेड अँण्ड ब्यूरीन इंडस्ट्री’ असे नाव दिले गेले आहे. अशी धारदार पाती लाकडाच्या किंवा हाडाच्या खोबणीत सलग बसवून त्यांचा कापण्यासाठी उपयोग करण्यात आला असावा. याप्रकारच्या हत्यारांच्या वापरांच्या मर्यादा लक्षात घेता, अशी हत्यारे अवजड कामासाठी वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे ही हत्यारे कोरड्या हवामानामध्ये उगवणारा विरळ व हलका झाडोरा अथवा गवत कापण्यासाठी केला जात असावा. ही हत्यारे सर्वसाधारणपणे नदीकाठच्या स्तरीय छेदामध्ये ( सेक्शन ) आढळून येणाऱ्या बारीक वाळूच्या थरामध्ये सापडतात.

ही हत्यारे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध झाली असली तरी त्यांचे विशुद्ध स्वरूपातील निक्षेप फारसे स्पष्ट नाहीत. मात्र अशा तर्‍हेची हत्यारे गोदावरीकाठी पैठण, घोडकाठी इनामगाव, प्रवरेकाठी संगमनेर येथे आणि चंद्रपूर जिल्ह्यात खोलरा गोडी या ओढ्याच्या काठी त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या काठी सापडलेली आहेत. मुंबईजवळ कांदिवली येथेही अश्मयुगाच्या विविध कालखंडातील हत्यारे टॉड यांना १९३६ साली मिळालेली होती. परंतु या हत्यार समूहाबद्दल विविध मते प्रचलित आहेत.

या कालखंडाशी निगडीत दोन महत्वाच्या स्थलांचा उल्लेख करणे जरूर आहे. गोदावरीकाठी पैठण येथे आणि पुणे जिल्ल्यात घोडनदीवरील इनामगावजवळ या कालखंडातील हत्यारांवरोवरच इतर महत्वाचा पुरावा मिळालेला आहे. या ठिकाणी हत्यारांच्या वरोवर शिंपले त्याचप्रमाणे शहामृगाच्या अंड्यांचे कवच ( पाटणे, जिल्हा जळगाव ) आणि इनामगावजवळ नामशेष झालेला प्राचीन बैल  या प्राण्याचे अश्मीभूत अवशेष मिळाले. उत्तर – पुराश्मयुगावद्दल वर उल्लेखिलेला पुरावा मांडला असला तरी याबद्दलचे संपूर्ण चित्र फारसे स्पष्ट नाही. ही अवस्था ‘मध्य – पुराश्मयुग’ आणि ‘मध्याश्मयुग’ यामध्ये सांस्कृतिक क्रमाच्या दृष्टीने येत असली तरी, याबद्दल हत्यारांचा पुरावा ज्या स्तरीय संदर्भात उपलब्ध होणे आवशयक आहे तसा पुरावा महाराष्ट्रामध्ये फारसा उपलब्ध नाही. या आधी गुजराथ, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू इत्यादी ठिकाणी तो एका विशिष्ट संदर्भामधे उपलब्ध झालेला आहे. महाराष्ट्रात प्रवरेच्या काठी नेवासे, वर्धा जिल्ह्यात झारपट नाला, पुणे जिल्ह्यात इनामगाव, अहमदनगर जिल्ह्यात, ढवळापुरी आणि जळगांव जिल्ह्यात गिरणा नंदीच्या काठी पाटणे या ठिकाणी तो मिळाल्याचा उल्लेख याआधी केलेला आहे.

पाषाणयुगीन महाराष्ट्र या कालखंडाचे वैशिष्ट्य ठरलेली गारगोटींची हत्यारे – लांव पाती, कोरके, लहान तासण्या, – नोक असलेली हत्यारे आणि वेधण्या – एका वैशिष्ट्यपूर्ण तंत्राने दगडी गाभ्यावर प्रक्रिया करून आणि. लाकडी दांडक्याचा ( सिलिंडर हॅमर ) वापर करून बनविण्यात आली होती याचाही उल्लेख आधी आलेला आहे. ऱ्या भागामध्ये आणि ज्या संदर्भामध्ये ही हत्यारे उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये सापडली आहेत त्यावरून या कालात हवामान काहीसे कोरडे असावे असा निष्कर्ष काढला गेला आहे. या हत्यारांवरोवर घोंडनदीवरील इनामगाव येथे पाणघोडा, घोडा, बैल, रेडा आणि सांवर यांची अश्मीभूत हाडे अलीकडे सापडली आहेत.

यावरून इनामगाव परिसरात तरी वराच झाडझाडोरा आणि काहीशी दलदलीची स्थिती असली पाहिजे असे मत मांडले गेले आहे. कारण त्या शिवाय पाणघोड्यासारखा प्राणी जगू शकणार नाही. महाराष्ट्रात गोदावरीच्या दक्षिणेस सापडलेला पाणघोड्याचा हा पहिला अवशेष आहे. महाराष्ट्रात या कालखंडाचे कार्वन-१४ पद्धतीने करण्यात आलेले कालमापन भारतातील इतर स्थलांशी (उत्तर प्रदेश : वेलन नदी : सुमारे १९,०००) मिळते जुळते आहे.

पाषाणयुगीन महाराष्ट्र मध्याश्मयुग (मेसोलिथिक)

उत्तरपुराश्मयुगाच्यानंतर सांस्कृतिक उत्कमाच्या दृष्टीने मध्याश्मयुग येते. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय लहान आकाराची, बहुतांशी भीमितिक आकाराची वनविलेली (त्रिकोण, समान्तर  द्विभुजचौकोन, चंद्रकोर वगैरे ) हत्यारे. ही हत्यारे चाल्सिडोनी, अँगेट, कार्नेलियन यासारख्या उत्तम पोताच्या गारंगोटीच्या छिलक्यापासून वनविली जात.यांचे सविस्तर वर्णन देण्याआधी एक वाव स्पष्ट करणे आवश्यक आहे.

मध्याश्मयुग कालदृष्ट्या आणि सांस्कृतिक उक्कमांच्या संदर्भात पुराश्मयुंग आणि नवाश्मयुग यांच्यामध्ये येते. म्हणून “पुराशमयुग’ आणि ‘नवाश्मयुग’या एका अर्थाने सांस्कृतिक संदर्भाच्या संज्ञा आहेत. परंतु ‘मध्याश्मयुग’ ही संज्ञा कालनिवध्द म्हणजे ‘पुराश्मयुग॑ आणि नवाश्मंयुग “यांच्यामध्ये असणारा कालखंड’ या अर्थाने रूढ झालेली आहे. खापरांचा वापर नसलेली, परंतु शेती व पशुपालन यावर आधारीत ग्रामसंस्कृतीच्या आधीची ही अवस्था आहे. या कालखंडाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की यात वापरली जाणारी हत्यारे अश्मयुगाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये सापडलेल्या हत्यारांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने विपुल आहेत.

म्रध्याशमयुगाची स्थले भारतामध्ये गंगा-यमुनादुआव, आसाम आणि कोकणपट्टी सोडून, जवळपास सर्वत्र सापडली आहेत. या कालातील लोक घट्ट झालेल्या वाळूच्या लहान लहान टेकड्यावर (गुजरात, मारवाड ) नैसर्गिक गुहात (मध्यप्रदेश ), नदीच्या गाळाच्या मैदानावर ( पश्‍चिम बंगाल ), खडकाळ परंतु सपाट प्रदेशावर (राजस्थानातील मेवाड), तळ्यांचे काठी (अलाहाबाद आणि प्रतापगढ़ : उत्तर प्रदेश) त्याचप्रमाणे काही वेळा समुद्रकाठी (सालसेट बेट : महाराष्ट्र ; तामिळनाडू : मद्रास जवळील “तेरी” स्थळे) – अशा विविध ठिकाणी वस्ती करून राहात असल्याचा पुरावा उपलब्ध झालेला आहे. या कालखंडाची भीमबेटका, आदमगड . (मध्यप्रदेश ), बागोर (राजस्थान ), बिरभानपूर (प. बंगाल), लांघणज ( गुजरात ), सराई नहर राय (उत्तर प्रदेश) ही महत्वाची ठिकाणे आहेत.

या कालखंडातील मानवी जीवन या आधीच्या कालखंडापेक्षा तौलनिकदृष्ट्या सुस्थिर झाल्याचे दिसते. या कालखंडात मेंढ्या, चितळ, नीलगाय, काळवीट इत्यादी प्राणी अस्तित्वात होते. मृताला पुरण्याची पद्धती या काळात प्रचलित झाली. काही ठिकाणी झोपड्यांचे अवशेष व त्यातील बनविलेली जमीन उत्खननामधे सापडली (पश्‍चिम बंगाल ). परंतु या कालखंडातील मानवाची साधनसामग्री मात्र अत्यंत मर्यादित असल्याचे आढळून येते. तोडण्या-फोडण्याकरिता आणि पिसण्याकरिता खोलगट पाटे आणि लंबगोल गोट्यांचा वापर करण्यात येत असे. *

या काळातील गारगोटीच्या छिलक्यापासून बनविलेली हत्यारे आकाराने लहान असली तरी त्यामध्ये खूप विविधता दिसून येते. उत्कृष्ट पन्हाळीदारू छिलके काढलेले गाभे (कोअर) आणि समांतर बाजू असलेले सुबक, पातळ छिलके हे या कालातील वैशिष्ट्य समजले जाते.

लहानलहान छिलक्यावर अत्यंत सूक्ष्म छिलके काढून त्यापासून विविध तर्‍हेची पाती, वेधण्या, त्रिकोण इत्यादी हत्यारे वनवीत असत. या हत्यारांची लांबी सर्वसाधारणपणे १ ते ३ सें. मी. आढळून येते आणि ही लाकडाच्या क्रेंवा हाडाच्या खाचेमध्ये नैसर्गिक गोंदाच्या साहाय्याने पक्की बसवून त्यांचा विळे वगैरेसारखा उपयोग केला जाई. महाराष्ट्रात अशा हत्यारांचा आढळ पुणे, जळगाव, धुळे, चंद्रपूर, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्यात व इतर अनेक ठिकाणी झालेला आहे.

सर्वसाधारणपणे तापी, गोदावरी, प्रवरा व इतर अनेक नद्यांच्या खोऱ्यामध्ये या कालखंडाची ‘ हत्यारे सापडली आहेत. त्यांचा काळ कार्बन- १४ कालमापनानुसार १२ ते 9३ हजार वर्षे इतका प्राचीन (घोड काठच्या इनामगाव येथील शिंपल्यांच्या कालमापनावर आधारित ) असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु सर्वसाधारणपणे या कालखंडाची व्याम्ती ५२ हजार ते ५ हजार वर्षपूर्व मानली जाते.

पाषाणयुगीन महाराष्ट्र ‘नवाश्मयुग’ 

अश्मयुगातील ही शेवटची अवस्था. हिला ‘नवाश्मयुग’ असे नाव देण्याचे कारण असे की या युगामध्ये मानवी जीवनात क्रांतीकारक बदल झाले. केवळ दगडी हत्यारांच्या दृष्टीने पाहावयाचे झाल्यास या कालातील दगडी हत्यारांचे तंत्र या आधीच्या अश्मयुगाच्या हत्यारांपेक्षा अत्यंत वेगळे दिसून येते. ‘डोलेराईट* या उत्तम पोताच्या काळ्याशार दगडापासून ही हत्यारे बनविली जात. गोट्यावर छिलके काढून योग्य तो आकार दिल्यानंतर या हत्यारांची वापरण्यास योग्य अशी वाजू खडकातील खाचात घासून धारदार करण्यात येत असे. किंबहुना सध्या वापरात असलेल्या लोखंडी कुऱ्हाडी व छिन्या इतक्याच नवाश्मयुगातील दगडी कुऱ्हाडी व छिन्न्या उपयोगी ठरतात.

भारतातील नवाश्मयुगाचा पुरावा काही विभागीय वैशिष्ट्ये असलेला आहे. त्यामुळे उत्तर भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असा सापडलेला पुरावा वर्गीकृत करता येतो. महाराष्ट्राच्या निकट असलेल्या आंध्र आणि कर्नाटकामध्ये नवाश्मयुगाचा पुरावा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला असून या संस्कृतीच्या लोकांच्या वस्त्यांचे अवशेष त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाचे विविध पैलू स्पष्ट करणारा पुरावाही. सापडलेला आहे. महाराष्ट्रात मात्र विशुद्ध उरे स्वरूपातील नवाश्मयुगीन संस्कृतीचा किंवा तिच्या स्थलाचा शोध अद्याप तरी : लागलेला नाही.

पाषाणयुगीन महाराष्ट्र  कालखंडामध्ये मानवी जीवनामध्ये क्रांतीकारक बदल झाला असे वर उल्लेखिले आहे. एके ठिकाणी झोपड्या बांधून स्थिर जीवनाची सुरूवात, पशुपालन, शेतीद्वारे धान्योत्पादन, घासून धारदार वनविलेल्या दगडी हत्यारांचा वापर आणि हातवनावटीच्या राखी रंगाच्या मडक्यांची निर्मिती – या क्रांतीकारक घटना या युगाशी निगडीत आहेत. धान्योत्पादनामुळे या युगात मानव भटके जीवन सोडून स्थिर जीवन जगू लागला. या आधीच्या अश्मयुगीन अवस्थांमध्ये तो “अन्नोत्पादक’ नसून ‘अन्न गोळा करणारा ‘, भटका होता.

नवाश्मयुगाचा व्यापक आढावा घेण्याचे प्रयोजन येथे नाही. आंध्र कर्नाटकामध्ये संगलकल, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, नागार्जुनकोण्डा, पालावाय, ब्रह्मगिरी, कोडेकल, उटनूर, इत्यादी ठिकाणी नवाश्मयुगीन अवशेष उत्खननामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये सापडले आहेत. गोल झोपड्यांची घरे, गायी – बैल, म्हैस, वकऱ्या, डुकरे यांचे कळप पाळणे, हुलगे, रागी इत्यादी धान्याचे उत्पादन करणे, जमिनीवर फरे पाडण्यास योग्य अशा गोल दगडी कडी वसलेल्या काठ्यांचा वापर करणे, काही वेळा (उत्तर काळात ) सोने आणि तांब्याचा वापर करणे त्याचप्रमाणे शंख, माती आणि दगडाचे मणी वापरणे, करड्या मडक्‍्यावर लाल गेरूचे पट्टे देऊन रंगकारी करणे. त्याचप्रमाणे (काही ठिकाणी) काळी – आणि – तांवडी मडकी वापरणे ही यांची वैशिष्ट्ये आंध्र – कर्नाटकामध्ये दिसून आली आहेत.
 
आंध्र-कर्नाटकातील नवाश्मयुगाची कालव्याप्ती सर्वसाधारणपणे इसवी पूर्व २४०० ते १००० अशी कार्बन – 9१४ पद्धतीनुसार निश्‍चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीची निदर्शक घासून धारदार केलेली हत्यारे, राखी रंगाचे दफनकुंभ इत्यादी वैशिष्ट्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अवशेषांवरोवर सापडलेली आहेत. यावरून सध्याच्या महाराष्ट्राचा आंध्र -कर्नाटकावरोवर संपर्क असावा असे स्पष्ट होते. नवाश्मयुगामध्ये मानव स्थिर जीवनाचा असला तरी, मोठ्या प्रमाणावर शेतीतून धान्योत्पादन, स्थिर स्वरूपाच्या खेड्यांची स्थापना, तांव्याचा तौलनिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर वापर आणि उत्कृष्ट वनावटीची चाकावर घडवलेली, चित्रकारी असलेली आणि उत्तम भाजणीची मडकी – ही सर्व वैशिष्ट्ये, या. नंतरच्या, म्हणजे ताम्रपाषाणयुगामध्ये दिसून येतात. शेती उद्यादनावर आधारीत स्थिर खेड्याची स्थापना ताम्रपाषाणयुगात महाराष्ट्रात इसवी पूर्व सुमारे. १५०० च्या आसपास झाली आणि हे कर्तृत्व ‘आद्य शेतकर्‍यांचे’ होते. धातुयुगाची सुरूवात याचवेळी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *