प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत

प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत

प्रतीक दर्शन

 

  प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भित व

 व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतिकाबद्दल तसेच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ

 सामावलेला असतो, एका लहानश्या बी मध्ये विशाल  वृक्षाचा विस्तार सामावलेला  असतो तसा प्रत्येक 

प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध  लपलेला असतो. हो भावनाच प्रतीकांना अर्थवान, सार्थथ्यशील व जीवंत

 बनवते. 

  भौतिकरीत्या पाहता राष्ट्रध्वज  हा कापडाचा लहानसा तुकडा आहे. याचे काही विशेष मूल्य नाहो, परंतु

 सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे. राष्ट्रातील  कोट्यावधी  जनतेच्या प्राणापणानेही त्याचे

 रक्षण केलेच पाहिजे. बांगड्या व कुकू ह्याच्यासारख्या सामान्य वस्तू जेव्हा स्रीच्या सौभाग्याचा विषय बनून

 उम्या राह्वातात त्यावेळी त्यांच्यामागे असलेली भावना ही लहानशा वस्तूंचे मूल्य अनेकपटीने वाढविते.

 सामान्य दगडाला शेंदूर फासताच तो दगड न राहाता तो देव बनतो. त्याची पुजा होते. प्रतीक ही मौनाची

 भाषा आहे. शान्तीचे संगीत आहे. संस्कृतीच्या महिम्याचे मूकगीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिन्दुमध्ये 

सिंधू पाहाण्याची हिम्मत किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती, प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त

 करण्याची कला, प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था, प्रतीक म्हणजे

 संकेतात शास्त्ररहस्य समजावण्याचे आगळे विज्ञान. 

    प्रवृत्तीमध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या आजच्या काळातील प्रत्येक मानवाचा व्यवहार वरवरचा बनला आहे.

 त्याच्या हास्यात प्रसन्नता नाही किंवा त्याच्या रुदनात अंतःकरणाची खरी व्यथा नाही, त्याच्या सेवेत प्रेम

 नाही की, त्याच्या कृतीत तत्परता नाही. त्याच्या अभ्यासात एकाग्रता नाही किंवा भक्तीत तल्लीनता नाही. 

त्याच्या संसारात अनुरक्ती नाही, त्याच्या संन्यासात विरक्ती नाही. सारांश, ह्याच्या जीवनाचा विस्तार

 वाढलेला आहे? पण त्याने जीवनाची खोली  गमावलेली आहे. ती खोली  पुन्हा प्राप्त करण्यासाठी मानवाने

 प्रतीकामागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी शाखांचे सखोल अध्ययन केले पाहिजे, मनमंदिरात

 दिवा पेटवला पाहिजे, तसेच हृदय सागराचे मंथन करण्यासाठी अविश्रान्त परिश्रम केले पाहिजेत.

    प्रतीकाच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज व  सरळ रीतीने संक्षेपात व्यक्त होऊ

 शकते. विरक्त वृत्तीने संसारात राहून संन्यस्त जीवन जगणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे असेल  तर

 त्यासाठी लांबलचक व्याख्यान देण्याएवजी कमळाची आठवण केली तर ” जलकमलवत ” एवढेच बोलून

 आपले काम पुरे होईल. जीवनात पाळावयाच्या विविध सूचना ‘ उंबरठा ‘ सहज रीतीने करून देतो.  तिलक

 बुद्धिपूजेचा महिमा समजावतो. स्मशानघट ‘ नश्वर जीवनाकडे आपले लक्ष खेचून घेतो. संस्कृत नाटककार

 स्वतःच्या नाटकाच्या सुरुवातीला मांगल्यमूलक ‘ नांदी ‘ लिहीत असत, परंतु एवढी साहित्यसाधना किंवा

 कविताशक्ति ज्याच्या जवळ नाही तो केवळ ” स्वस्तिक” चे प्रतीक काढून स्वतःच्या कार्याचे शुभ किंवा

 मांगल्य सहजपणे प्रकट करू शकतो. अशिक्षित माणूसदेखीळ निशाणी पाहून मतदान करू शकतो

 त्याच्यासारखे हे आहे.

    ह्याप्रमाणे प्रतीकांची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर हे सांस्कृतिक संकेत आपल्या

 जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहक तसेच कार्यसाधक बनतील, संस्कृतीची सर्वच प्रतीके आपण संपूर्णरीत्या 

समजलो आहोत असे म्हणणे ही बौद्धिक बालिशता समजली जाईल. त्यांची उपासना किंवा यथाशक्ती पूजा

 करता येते. तशीच बुद्धीची कृतज्ञता हे जीवनाचे किंचित साफल्य समजता येईल. प्रतीकोपासना आपल्या

 जीवनात अशा प्रकारची कृतार्थता व अशा प्रकारचे साफल्य निर्माण करो.  

 

(पुढील लेखात  आपण ओंकार या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया….)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक

Leave a Reply

Your email address will not be published.