महाराष्ट्राची चित्रकला – Painting of Maharashtra

महाराष्ट्राची चित्रकला – Painting of Maharashtra

चित्रकला म्हटल्याबरोबर महाराष्ट्रात प्रथम डोळ्यासमोर नाव उभे राहते ते अजिंठ्याचे. येथील बौध्द गुंफातील चित्रकाम भारतातच नव्हे तर सर्व जगात ख्यातनाम झालेले आहे. चवथ्या-पाचव्या शतकात केव्हांतरी गौतम बुध्दाच्या थोरबीचे प्रकटन करण्यासाठी ही चित्रे रंगविण्यात आली. या ठिकाणच्या एकेका गुंफेतील चित्रकामाची,प्रसंग-चित्रांची दखल येथे घेता येणार नाही, दखल घ्यावयाची आहे ती परंपरेची, अजिंठा चित्रकाम जिच्यातून निर्माण झाले त्या कलापरंपरेची. ही परंपरा दृगोचर होते तेवढ्या पुरताचा अजिंठ्याचा निर्देश करता येतो. आज क्रमांक एक, दोन, सोळा व सतरा या गुंफातील चित्रकाम अवशिष्ट आहे. यापैकी क्रमांक एकच्या लेण्यातील काम बरेच टिकून आहे. या लेण्यातील भिंती, खांब, छत हे सगळे भाग रंगकामाने मढविलेले आहेत. 

महाराष्ट्राची चित्रकला - Painting of Maharashtra

भितींवरील चित्रे ही बोधिसत्वाच्या, गौतमाच्या चरित्रातील प्रसंगांची असली तरी स्तंभ व छत यावरील रंगकाम केवळ अलंकरणात्मक आहे, शोभेसाठी केलेले आहे. काहीशामातकट दिसणाऱ्या गुलब्राक्षी रंगाच्या पृष्ठभूमीवर, फळेफुले, भौमितिक आकृती, पशुपक्षी,यक्ष-यक्षी यांची चित्रे आहेत. पुढे वेरुळच्या कैलास लेण्याच्या मंडपात चित्रे रंगविण्यात आली. ती बरीचशी नष्ट झाली असली तरी दोन्ही जैन लेण्यातील चित्रकाम अजूनहि चांगल्या स्थितीत आहे. येथेहि भिंती, छत हे सगळे भाग चित्रांनी मडविलेले आहेत. यावरून, वास्तुशोभनासाठी, इमारती सुशोभित करण्यासाठी रंगकामाचा, चित्रकामाचा उपयोग सरसहा करण्यात येत होता हे स्पष्ट होते. इतर प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही ही प्रथा प्राचीन काळी अस्तित्वात होती, गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ होती. पुढे मराठेशाहीत तिचा सर्वत्र बापर झालेला दिसतो. तिथेहि गुलबाक्षी रंगाच्या पृष्ठभूमीवर नाना विषय चित्रित केलेले दिसतात. मध्ययुगाच्या आधी आणि नंतर वास्तूच्या सजावटीसाठी हे एकच माध्यम वापरलेले होते यावरून मध्ययुगातही घरेदारे रंगवीत असत, त्यावर चित्रे काढीत असत असा अंदाज केल्यास फारसे चुकणार नाही. दुर्दैवाने आज या काळातले राहते वाडे, राजप्रासाद अशासारख्या वास्तू कोठे शिल्लक राहिलेल्या नाहीत. एकदोन ठिकाणी अवशिष्ट रुपात  आहेत. 

दौलताबादेच्या परिसरात एकदोन आहेत आणि विजापूरजवळ कुमटगी येथे आदिलशाहीतील जलमंदिराचा काही भाग पाऊणशे वर्षापूर्वी उभा होता. त्याचे वर्णन नोंदविण्याऱ्या अभ्यासकांनी या महालातील चित्रकामाची नोंद घेतली आहे. त्यावरून या काळात इमारतींच्या सजावटीसाठी रंग-चित्रे यांचा उपयोग करण्यात येत असे हे स्पष्ट होते. भित्तिचित्रे हे भारतीय चित्रकलेचे सर्वात महत्त्वाचे अंग होते, प्राचीन काळापासून तो थेट अठराव्या शतकापर्यंत ही प्रथा रुढ होती. 

मात्र मध्ययुगातील कामाचे नमुने उपलब्ध नसल्याने मध्ययुगीन चित्रकलेचा मागोवा घेण्यासाठी एका निराळ्या माध्यमाकडे वळावे लागते. ते माध्यम म्हणजे कापडी पट आणि कागद. या काळातले पटही उपलब्ध नाहीत म्हणून फक्त कागदावर काढलेली चित्रे व त्यांची परंपरा ध्यानात घेता येते. परंतु अशी चित्रे संख्येने फारच थोडी आहेत. तीही काहीशी फुटकळ, तुटक स्वरुपाची. खानदेश, एलिचपूर इकडे झालेले चित्रकाम अद्याप मिळालेले नाही. अहमदनगर येथे झालेले काम शिल्लक आहे. त्यात एकच संग्रह असा आहे की ज्याच्या काळाविषयी काही निश्चित सांगता येते कारण ही चित्रे ग्रंथबध्द आहेत. 

भारतातील सगळ्याच सल्तनतीत ग्रंथलेखन आणि ग्रंथसजावट या कलांना महत्त्व होते. दिल्ली, गुजरत, माळवा इकडे चित्रकलेचा मुख्य अविष्कार झाला तो ग्रंथातील चित्रांच्या रुपाने. महाराष्ट्रातही याच प्रकारे चित्रकलेचा आरंभ (मध्ययुगापुरता) झाला. आज उपलब्ध असलेला आणि प्रसिध्द झालेला सर्वप्राचीन चित्रयुक्त ग्रंथ म्हणजे ‘तारीफ-इ-हुसेनशाह इ. ‘* या ग्रंथाची रचना हुसेन निजामशाहाच्या कारकीर्दीच्या शेवटी-शेवटी सुरू झालेली असली तरी तो पूर्णत्वाला त्यांच्या मृत्यूनंतर गेला. ग्रंथ पूर्ण करून घेण्याचे व त्यातील चित्रे काढविण्याचे काम हुसेनची पत्नी हुमायूँशा हिने केले असावे. त्याच्या मृत्यूनंतर काही काळ निजामशाहीची सत्ता तिच्या हाती होती व त्याकाळात हे काम पूर्णत्वाला गेले असावे. म्हणजेच या ग्रंथाचा आणि त्यातील चित्रकामाचा काळ इ. स. १५६५ ते १५७० असा असावा. चित्रव्रिषय हे ग्रंथाला अनुसरून आहेत. फारसी काव्यग्रंथाच्या प्रथेप्रमाणे याचे दोन ठळक भाग आहेत, एकात त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे, वीरगाथा ‘बझमनामा’ तर दुसऱ्यात त्याच्या प्रणयाराधनेचे *र्झमनामा’, बीर आणि शृंगार हे दोन रस प्रमुख असल्याने चित्रकाराला सुयोग्य वर्ण्यविषय मिळालेले आहेत. पुस्तकाचे संपूर्ण पान भरेल अशी तेरा चित्रे या हस्तलिखित ग्रंथात आहेत.

“दख्खनी कलम’ म्हणून पुढे प्रसिध्दीस आलेल्या चित्रशैलीचे उगमस्थानी असल्याने या चित्रांना विशेष महत्त्व आलेले आहे. याच रोपट्याचा मोठा वृक्ष होऊन विजापूर, गोवळकोंडा येथे अत्यंत उच्च प्रतीची आणि विलोभनीय अशी चित्रशैली उत्पन्न झाली. “तारीफ च्या चित्रांची निर्मिती अर्थातच अचानक झालेली नाही. त्यांना पूर्वपीठिका आहे आणि ती अनेक पदरी आहे. या चित्रातील तपशील नीट पाहिला तर हे सहज ध्यानात येते की यापूर्वीच्या इराणी, माळवा दरबारातील तसेच विजयनगरमधील (लेपाक्षी) चित्रकलेशी या चित्रकाराचा चांगलाच परिचय होता. त्यातील रंगरेषांच्या बारकाव्याची उत्तम माहिती होती. या सर्वांपासून त्याने काहीना काही बारकावे, तपशील उचलला पण सबंध चित्र मात्र असे तयार केले की चित्रांना स्वत:चे निराळेपण, वैशिष्ट्य प्राप्त झाले. इतरांशी नाते ठेवून असणारी पण त्यांच्यापेक्षा भिन्न अशी चित्रशैली त्याने निर्माण केली.

ही चित्रे आहेत तरी कशाची ? तेरापैकी चार चित्रे ही हुसेन निजामशाह आणि त्याची प्रिय बेगम हुमायूशा यांची एकत्र आहेत. एकात निजामशाह एकटाच आहे. सहा चित्रे तालिकोटच्या रणसंग्रामाची आहेत तर एक चित्र आहे एका युबतीचे. फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी हातात धरून ती उभी आहे आणि शेजारी तिच्या सखी दिसतात. हे चित्र प्राचीनकाळी प्रचलित असणाऱ्या ‘दोहदपुरण’ नावाच्या विधीचे आहे. पहिले पान सजावटीच्या चित्राचे अशी तेरा होतात.

हुसेन निजामशाह आणि हुमावूँशा यांची चित्रे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, एका अर्थाने अद्वितीय म्हणावीत अशी आहेत. दोन चित्रात राजाराणी एकाच मंचकावर पण शेजारी-शेजारी बसली आहित. दोन चित्रांमध्ये राणी, राजाच्या मांडीवर बसलेली असून दोघांचे हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवलेले आहेत. या चारही चित्रातील निजामशाहचे चित्र एकसारखे आहे, इतकेच नव्हे तर पाचव्या, म्हणजे ज्यात सुलतान एकटा आहे त्यातील चित्र त्याच माणसाचे आहे हे सहज जाणवते, याचा अर्थ असा की ही अगदी खऱ्याखुऱ्या अर्थाने व्यक्तिचित्रणे आहेत. यावरून बेगमची चित्रे तशीच, व्यक्तिचित्रणे असावीत हे उघड आहे. परंतु पुढच्या काळात कोणी तरी पुन्हा रंगकाम करून राणीचे चित्र झाकून टाकले आहे. असे करताना, राजाचा जो हात तिच्या खांद्यावर होता त्याची फेरमांडणी किंवा फेरआखणी करावी लागली आहे. चारही चित्रात, नंतर लावलेला रंग फिकट तरी झाला आहे किंवा उडून तरी गेला आहे त्यामुळे राणीची आकृती दिसू लागली आहे. 

इराणी किंबहूना अन्य कोणत्याच देशातील इस्लामी चित्रकारांनी एखाद्या विशिष्ट स्त्रीचे व्यक्तिचित्रण शखाटलेले नाही. निदान असे चित्र कोठे प्रसिध्द तरी झालेले नाही. काव्यामधे, कथेमधे येणार्‍या स्त्रीपात्रांची चित्रे आहेत. ळैला-मजनू किंवा शिरीन-फरहाद यांच्या चित्रात त्या काव्यांच्या नाविकांची चित्रे आहेत पण स्त्रियांची न्यक्तिचित्रणे अजिबात नाहीत. येथे मात्र राणीचे व्यक्तिचित्रण आहे. निजामशाह आणि त्याची बेगम अशा पध्दतीने बसली आहेत की त्यांना पाहिल्यावर विष्णू-लक्ष्मी किंवा शिव-पार्वती यांच्या मूर्ती ज्या पध्दतीने घडवितात त्याचीच आठवण यावी. चित्राचा आशव हा केवळ भारतीयच मव्हे तर हिंदू परंपरेतील आहे. अहमदनगरच्या राजघराण्याचा संस्थापक मलिक निजाम हा जन्माने हिंदू होता, पुढे मुसलमान झाला. 

नगर-वऱ्हाड यांच्या जवळजवळ हद्दीवर असणाऱ्या पाथरी गावी कुलकर्णीपणाचे काम करणाऱ्या कुटुंबातील होता. पाथरीचे कुलकर्णी आणि नगरचे “बहरी’ (बहिरोपंताचे) राजघराणे यांचे नाते पुढे कित्येक पिढ्यापर्यंत दोन्ही बाजूंच्या, या स्मरणात होते. पाथरी गाव आपल्या ताब्यात आणण्यासाठी निजामशाहांनी सतत प्रयत्न केले होते. तो थोडा निसळा भाग म्हणून सोडून दिला तरी, या घराण्याची हिंदू पूर्वपीठिका विसरता येत नाही. त्यामुळेच, राजाराणी ही साक्षात विष्णुलक्ष्मीच असे समजण्याच्या हिंदू परंपरेतूनच हुसेन निजामशाह आणि हुमायूँशा यांची ही चित्रे निर्माण झाली आहेत असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.

“दोहदपूरण’ या नावाने ओळखले जाणारे चित्र याहीपेक्षा जास्त लक्षवेधक ठरते. फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी हातात धरून उभी असणारी राजस्त्री आणि तिच्या चारपाच सख्या असे हे चित्र आहे. एखाद्या सुंदर स्त्रीने अशोकाच्या झाडाला आपल्या पायाने स्पर्श केला असता त्या वृक्षाला फुलांचा वहर येतो असा प्राचीन कविसंकेत आहे. त्याचा वापर संस्कृत वाडमंयात अनेकदा केलेला आहे.-: ‘मालविकाग्रिमित्र’ नाटकात याच संकेताचा उपयोग केलेला आहे. प्राचीन शिल्पात वृक्षाला पायाने विळखा घालणारी, आलिंगन देणारी, त्याच्या फांदीला लोंबकळणारी तरूण स्त्री सर्वत्र आढळते. तिला ‘वृक्षी’ म्हणूनच ओळखतात. या विशिष्ट शिल्पाचा प्रजननाशी संबंध आहे. आणि सुंदर स्त्रीच्या पदस्पर्शनि नहर येतो तसा या वृक्षस्पर्शाने स्त्रीची अपत्यप्राप्रीची इच्छा सफल होते ! अशोकाच्या झाडाची इच्छा पुरविली की त्या स्त्रीची पुत्रप्राप्तीची कामना पूर्ण होते, म्हणून स्त्रिया हा विधी करीत असत. तोच विधी हसेनशाहाची रुपवती बेगम येथे करीत असावी. दोहदपूरण स्त्री अन्य कोणी नसून हुमायूँनशाहच आहे. हे तिचेच व्यक्तिचित्रण आहे. हा संकेत समजल्यामुळे सुधारणावाद्यांनी या चित्राला हरताळ फासला नाही. मात्र हे बेगमचेच आहे याची जाणीव त्यांना झाली नसावी. माही तर इतर चित्रातल्याप्रमाणे नेगमचे हेही चित्र त्यांनी “मिटवले असते. परंतु हे चित्र जर बेगमचे नसेल तर या पुस्तकात त्याचे प्रयोजनच उरत नाही, ते इथे कशासाठी रंगविण्यात आले आहे याचा उलगडाच होवू शकत माही. ग्रंथातील प्रत्येक चित्र हे निजामशाहाशी संबंधित आहे हे ध्यानात घेतले म्हणजे त्याच्याशी अथवा त्याच्या प्रियतमेशी संबंध नसणारे चित्र या ग्रंथात येऊ शकणार नाही हे स्पष्ट होते. बरोबर बेगम नसलेला, एकटाच मंचकावर बसलेला हुसेनशाह एकाच चित्रात आहे. हा देखावा आहे दरबारात चाललेल्या नृत्यगायनाचा. ह्याच्या डाव्या हाताला जमिनीवर दोघे नसलेले आहेत त्यापैकी एकजण हातवारे करून काहीतरी सांगतो आहे किंवा गातो आहे. त्यांच्यामागे वीणा व टाळ घेतलेले दोघे साथीदार उभे आहेत. चित्रात खालच्या पट्ट्यात दोघी नर्तिका आणि त्यांचे साजिंदे दिसतात. निजामशाहाची चेहरेपट्टी आधीच्या चार चित्रांसारखी, त्याचे न्यक्‍तित्व सहज ओळखू येईल अशी आहे. आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रात दोन्ही बाजूला रुमालाने वारा घालणाऱ्या दासी उभ्या आहेत. त्यांच्या आकृती उभट, काहीशा सडपातळ आहेत, चेहे जवळजवळ एकसारखे आहेत आणि अंगाखांद्यावर दागंदागिने आहेत.

चित्रातील आकृतींचे संयोजन आणि पृष्ठभूमी जवळपास सारखीच आहे. बादशहा व बेगम ही मध्यभागी, इतरांपेक्षा, थोड्या मोठ्या आकाराची. त्यांच्या भोबती कमानी, खिडक्या अशी वास्तुरुप चौकट आहे. त्यातून फुलझाडे डोकावतात. वरच्या बाजूला कापडी छत आहे व त्यावर नक्षीकाम. एका चित्रात त्याच्याही वर घुमटकार छप्पर दिसते. मात्र हे सगळे भाग आखीव, वेगवेगळ्या आकाराचे तुकडे कापून एकमेकाशेजारी चिकटवावेत तसे दिसतात. पृष्ठभूमीच्या निरनिराळ्या पातळ्या एकमेकात मिसळून गेल्याचा भास कोठेही होत नाही. त्यामुळे एखाद्या रंगपटावरचा प्रसंग बघतो आहे असा भास होतो. 

रणसंग्रामाच्या सहा चित्रात खूपच सारखेपणा आहे. सैनिक, घोडेस्वार, हत्ती हे सगळे तीन आडव्या पट्टयात, एकावर एक असे मांडले आहेत. त्यांच्या हालचालीत गती, जिवंतपणा निश्चितच आहे, पण तरीही एकूण चित्रसंयोजन फार आखीव असे वाटते. यातल्या एका चित्राचा विशेष उल्लेख करावयास हवा. यात रामराजाचा शिरच्छेद करणारा बादशहा दाखविला आहे.

चित्रांची रंगयोजना गडद, काहीशी भडक म्हणावी अशी आहे. सगळ्याच चित्रांना गडद निळ्या किंवा दाट हिरव्या रंगाची पृष्ठभूमी आहे. स्त्रियांची वसे अशाच हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाची आहेत, त्यावर सोनेरी रंगाने नक्षी किंबा दागिने दिसतात. पुरूष आकृती सहसा पांढर्‍या स्वच्छ कपड्यात आहेत. छतासाठी व कनातींसाठी काहीशा फिकट निळसर रंगाचा उपयोग केला आहे, तसा एका चित्रात निजामशाहाचा अंगरखा किंचित गुलाबी रंगाचा दिसतो.या चित्रांना पूर्वपीठिका आहे आणि ती अनेक पदरी आहे याचा उल्लेख वर केला आहे. त्याचे थोडे विवेचन करता येईल. चित्र संयोजन, त्यातील वास्तुखंड, कमानी, फुलझाडे ही इराणी चित्रात दिसतात तशी आहेत. पुरूषमाणसांच्या आकृती व चेहरेपट्टी (निजामशाह सोडून इतरांची) ही मांडूच्या चित्रातल्या पुरुषांसारखी आहे. दासींची आणि दोहदपूरणाच्या-चित्रातील बेगमेची आकृती, त्यांची वस्रे ही सगळी विजयनगरच्या चित्रांशी नाते सांगतात. विशेषत: त्या दोन नर्तकी खास दक्षिण भारतीयच दिसतात. चित्रांची रंगसंगतीसुध्दा विजयनगर. परंपरेतील आहे, असे टीकाकार समजतात. इतके सगळे घटक एकत्र आणून एक निराळेच रसायन तयार करणारे हे चित्रकार कोठून आले आणि हुसेनशाहाच्या मृत्यूनंतर त्यांचे काय झाले, या परंपरेतील चित्रे फारशी का निघू शकली नाहीत याचा नीटसा उलगडा इतिहास करू शकत नाही.

निजामशाहाचे एक रेखाचित्र उपलब्ध झाले आहे. त्यात हुसेन निजामशाह उभा असून समोर छोटेखानी हत्ती व त्यावर माहुत दिसतो. एका बाजुला फुलझाड आहे. या चित्रातील चेहऱ्यात आणि तारीफ मधील त्याच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे की हे चित्र त्याच कल्मकाराच्या हातचे असावे असे वाटते. याशिवाय मूर्तजा निजामशाहाची दोन आणि तिसऱया बुऱ्हाण निजामशाहाचे एक अशी चित्रे संग्रहालयातून सुरक्षित आहेत. एकात, मोठ्या शोभिवंत खुर्चीत सुलतान बसला असून त्याच्या डाव्या हाताला दोन व समोर एक सेवक उभे आहेत. दुसर्‍या चित्रात हाच सुलतान, एका छप्परपलंगावर लोडाला टेकून विसावा घेत असलेला दिसतो. दोन्ही चित्रातील सुलतानांच्या चेहऱ्यात साम्य आहे. सर्वच माणसांचे चेहेरे साधारण तीनचतुर्थांश दिसतात- एकचप्म नाहीत. दोन्ही चित्रांची पृष्ठभूमी सपाट रंगाने आच्छादलेली आहे-तीत कसलाही तपशील नाही-इमारती, कनाती, झाडेझुडपे काहीही नाहीत. तारीफच्या चित्रात करण्यात आलेले बारकाव्याचे काम पाहता ह्या चित्रातील तपशीलाचा पूर्ण अभाव काहीसा चमत्कारिक वाटतो. तिसर्‍या बुऱ्हाणशाहाचे म्हणून जे चित्र दाखवितात ते आणखीनच निराळे दिसते. हे चित्र एकचष्म पध्दतीचे आहे आणि हातात भलीमोठी तलवार घेतलेला एक मध्यमवयीन राजपुरुष रेखाटलेला आहे. याही चित्राला म्हणावी तशी पृष्ठभूमी नाही. वाखेरीज मलिक अंबर व त्याचा मुलगा फत्तेखान यांची व्यक्तिचित्रणे बोस्टनच्या संग्रहात आहेत, दोन्हीतही- एकचष्म पध्दतीचे गेखाटन आहे आणि चेहरेपट्टीत, व्यक्‍्तिचित्रणाचा हेतू स्पष्ट जाणवतो-वेगवेगळी माणसे आहेत हे ओळखू येते. अहमदनगरच्या संग्रहालयातही मलिक अंबरचे एक चित्र आहे, मात्र या तीनही चित्रांचा, तारीफच्या चित्रांशी कसलाच संबंध दिसत नाही- चित्रसंयोजन. रंगयोजना या सर्वस्वी भिन्न आहेत.

यांशिवाय निरनिराळ्या संग्रहालयात असणारी दहाबारा रागमाला चित्रे, खुद्द अहमदनगरमधे किंवा आसपासच्या भागात तयार झाली असावीत. काही चित्रातील पृष्ठभागातील इमारती, कनाती, घुमट यांचा वापर, पुरुष आकृतींचे चेहरे व शिरस्त्राणे आणि काहीशा उंच सडपातळ अशा स्त्रीआकृती व त्यांचे पेहराव याचे तारीफमधील तत्सम तपशीलाशी निश्चितच साम्य आहे. परंतु इतर गोष्टी-विशेषत: चित्रसंयोजन, वृक्षवल्लीचे रेखाटन आणि रंगयोजना यांचे मुगळ चित्रकामाशी जास्त जवळचे नाते आहे. ती चित्रे. त्या दरबाराशी संबंध आलेल्या किंवा त्याच परंपरेत वाढलेल्या एखाद्या कलाकाराने काढलेली असावीत, मात्र त्याचा अहमदनगर चित्रकलेशी चांगला परिचय असावा.

निजामशाही चित्रकला बहुगुणी असली तरी अत्यंत अल्पजीवी ठरली, त्याचे मुख्य कारण सोळाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी झालेला त्या सत्तेचा ऱ्हास हेच होय. ज्याप्रमाणे अनेक साहित्यिक हा दरबार सोडून विजापूर-गोवळकोंडा इकडे गेले तसे. चित्रकारही गेले असावेत. सतराव्या शतकाच्या पहिल्या चरणात तर या सल्तनतीची वाताहातच झाली व दख्खनी चित्रकलेचा हा पहिला अध्याय समाप्र झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *