राजे सयाजीराव गायकवाड
राजे सयाजीराव गायकवाड
राजे सयाजीराव गायकवाड
राजे सयाजीराव गायकवाड – पूर्व इतिहास

छत्रपती शिवरायांच्या अनेक पराक्रमी मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याचे निशाण अटकेपार नेले. त्यात होते शिंदे, घोरपडे, निंबाळकर, दाभाडे आणि गायकवाड मराठी सेनेने सेनापती दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेत मुसंडी मारली, तेव्हा दामाजी गायकवाड या मराठा सरदाराने गुजरातेतील मोगलांना काठेवाडपर्यंत हरविले आणि बडोद्यात गायकवाड घराण्याची सत्ता सुरू झाली. गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरजवळच्या दावडी गावाचे .
मराठे आणि अहमदशहा अब्दालीत १७६१ साली तिसरी लढाई झाली. यात मराठी सेनेचा एकीच्या अभावी मोठा पराभव झाला. हरलेल सैन्य सैरावैरा पांगले. या लढाईत मराठ्यांच्या बाजूने बडोद्याचे दामाजीराव व त्यांचे बंधू प्रतापरावही होते. पराभवानंतरच्या पळापळीत दोघा भावांत फाटाफूट झाली. दामाजीराव गायकवाड कसेतरी एकटे बडोद्यात परतले. प्रतापराव बरेच दिवस परागंदा होते. नंतर ते फिरत फिरत. नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावात स्थायिक झाले. शेतीबाडी करू लागले. अशा प्रकारे बडोद्याच्या गायकवाडांची एक शाखा खानदेशात वाढू लागली.
मधल्या काळात बडोद्यात खंडेराव गायकवाड बडोदा गादीवर होते. जमनाबाई त्यांच्या राणी. अल्पशा आजाराने खंडेरावांचे देहावसान झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने, त्यांचे बंधू मल्हारराव गादीवर आले. मल्हाररावांत राज्य सांभाळण्याचे गुण नसल्याने प्रजा जुलूम, अत्याचाराने जेरीस आली. याच काळात मल्हाररावांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्यास सरनतातून विष पाजले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. चौकशी होऊन ब्रिटिश सरकारने मल्हाररावांना पदच्युत केले. खंडेरावांच्या पत्नी जमनाबाईंना दत्तक पुत्र घेण्याची परवानगी सरकारने दिली.गायकजाडांची एक शाखा खानदेशात वाढू लागली.
मधल्या काळात बडोद्यात खंडेराब गायकबाड बडोदा गादीवर होते. जमनाबाई त्यांच्या राणी, अल्पशा आजाराने खंडेराबांचे देहाबसान झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने, त्यांचे बंधू मल्हाराब गादीवर आले. मल्हारराबांत राज्य सांभाळण्याचे गुण नसल्याने प्रजा जुलूम, अत्याचाराने जेरीस आली. याच काळात मल्हाररावानी एका ब्रिटिश अधिकाऱ्यास विष पाजले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. चौकशी होऊन ब्रिटिश सरकारने मल्हारराजाना पदच्युत केले. खंडेराबांच्या पत्नी जमनाबाईंना दत्तक पुत्र घेण्याची परजानगी सरकारने दिली. दत्तकपुत्र अल्पवयीन आणि गायकवाड घराण्यातला असावा, अशी अट टाकली. बडोद्यात गायकवाडांची काही घरे होती. त्यांची चारही मुले वयाने मोठी होती.. गायकवाडांचे एक घर कवळाणाला असल्याचे माहीत होते. नाशिकच्या कलेक्टरांना सूचना गेली. मालेगावजवळच्या कवळाण्यात ते घोड्यावर आले. गावात काशीराव गायकवाडांना भेटले. गायकवादांची चार मुले बंदोबस्तात बडोद्यास पाठविली.
राजे सयाजीराव गायकवाड – निवड व राज्याभिषेक
बडोद्यात राजमाता जमनाबाईसाहेब यांनी एकेका मुलाला बोलावले. प्रत्येकास विचारले, “तुम्ही इथं कशाला आलात?” पहिला गोंधळला. दुसरा म्हणाला, “माहीत नाही.” तिसऱयाने सांगितले, “शिकायला आलोय.” शेवटी बारा वर्षांचा गोपाळ महाराणींसमोर आला. त्या गोपाळला निरखू लागल्या. त्याचा चेहरा शांत होता. चेहऱ्यावर हुशारीची चमक दिसत होती. डोळ्यांत आत्मविश्वास जाणवला. जमनाबाईंच्या प्रश्नावर तो त्यांच्याकडे धीटपणे बघून म्हणाला, “मी राजा बनण्यासाठी आलो आहे.” गोपाळचा आत्मविश्वास बघून जमनाबाई चकित झाल्या: त्यांनी आनंदाने मनोमनी गोपाळची निवड केली. दिवाण आणि बरोबरच्या मंडळींचा सल्ला घेऊन गोपाळची दत्तकपुत्र म्हणून निवड केली. कवळाण्याच्या मंडळींना बडोद्यात आणले. दत्तकविधान होऊन त्याच दिवशी २७ मे १८७५ला राज्याभिषेक झाला. कवळाण्याचा शेतकऱ्याचा पोरगा दैवयोगाने बडोद्याचा राजा झाला. राजाचे नाव ठेवले सयाजीराव तिसरे.
अक्षरओळख नसलेला हा किशोरराजा राज्यकारभार आणि अक्षर-अंकज्ञान शिकू लागला. राजमाता, केशवराव पंडित आणि भाऊ मास्तरांनी याची चांगली सुरुवात केली. चार महिन्यांनी वऱ्हाडचे शिक्षण संचालक इलियट हे मुख्य शिक्षक म्हणून आले. चांगले शिक्षक लाभल्याने मेहनती सयाजीरावास शिक्षणाने नव्या जगाची ओळख झाली. शिक्षण हा तिसरा डोळाच आहे, हे या तरुण राजाने नेमके ओळखले. अठराव्या वर्षी प्रत्यक्ष राज्यकारभार हाती आला आणि राजाने प्रथमच राज्यभर दौरा केला. राज्याची पाहणी केली. प्रजेची सुख-दुःखे जाणून घेतली. गावातील गरीब शेतकरी, जंगलातले आदिवासी अन् अस्पृश्य प्रजेची दयनीय अवस्था बघून त्यांना आपले कवळाणा खेडे आठवू लागले.
राजे सयाजीराव गायकवाड – सामाजिक, राजकीय कारकीर्द
ब्राह्मणेतरांसाठी वेदोक्तपाठशाळा काढल्या. संन्यास घेण्यासाठी नियम केले. बालविबाहबंदी, विधवा पुनर्विवाह, मुला-मुलींचे विवाहाचे. वय, दानधर्म कायदा, अस्पृश्यांना मंदिर आणि सरकारी कार्यालयात मुक्त प्रवेश हे कायदे केले. दानधर्माच्या नावाखाली महिन्यात दीड लक्ष रुपयांची खिचडी ब्राह्मण आणि मुसलमानांना वाटली जाई. ती बंद करून अपंग, निराधार, गरजूंना प्रमाणपत्र देऊन मदत सुरू केली. सयाजीरावांनी केलेल्या ह्या सुधारणा आणि कायदे युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांहुन सुधारलेले होते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे.
साहित्य, कला, संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे सयाजीराव मानत. संगीत, शिल्पकला, लोककला, प्राच्यविद्या आणि हस्तकला हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. याच्या संवर्धनासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केली. तसेच ते लेखक-प्रकाशक आणि कलावंतांचे पोशिंदे झाले. हिंदुस्थानात स्वतंत्र भाषांतर शाखा काढून उत्तमोत्तम ग्रंथांचे देशी भाषांत अनुवाद करून घेतले. क्रीडाकोश, राज्यव्यवहारकोश, आहारकोश आणि प्राचीन ग्रंथांचे प्रकाशनही बडोद्यातून केले.
मुलांना शालेय जीवनापासून व्यायामाची सवय हवी म्हणून शाळांतून क्रीडाशिक्षण सक्तीचे केले. गावोगावी व्यायामशाळा उघडल्या. महिलांसाठीही मोठ्या गावांत खास व्यायामशाळा काढल्या. शेतकर्यांच्या मुलांसाठी शेतीविषयक कौशल्य शिक्षणाचे वर्ग, शेतकी शाळाही सुरू केल्या. शेतकी उपयोगी जनावरांच्या हिंसेस कायद्याने बंदी केली. महिला शिकल्या पाहिजेत म्हणून प्रौढ महिलावर्ग सुरू केले. मुस्लिम महिलांसाठी जनाना वर्ग काढले.
लोकांचे आरोग्य जपण्यासाठी मोफत औषधांची सोय केली. हिंदू विधवा स्त्रीबरोबर कुटुंबातील मुलींना, बहिणींना माहेरच्या मिळकतीचा हक्क कायद्याने दिला. जात आणि जातपंचायतीचे निर्बंध कायद्याने दूर केले. सोळा वर्षांखालील मुलांना बिडी, सिगारेट, तंबाखू विकण्यास बंदी केली. कोणत्याही रस्त्यावरून बाद्य बाजबिण्याचा नागरिकांना हक्क आहे, असा कायदा केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यात धारा सभा (कायदे मंडळ) स्थापन केली.
राजे वारंवार परदेशात जात होते. जगात जे जे त्यांना नवे आढळले ते बडोद्यात आणू लागले. ब्रिटिश सरकारच्या हिंदुस्थानातील प्रमुख जनरल गव्हर्नर लार्ड कर्झन यांना हि बाब खटकली . त्यांनी आदेश काढला, “देशातील राजांना परदेशात जायचे असल्यास त्यांनो अगोदर सरकारची परवानगी घ्यावी.” राजे सयाजीराज गायकवाड हे. स्वाभिमानी होते. देशप्रेमाचा संस्कार झालेले. इस्ट इंडिया कंपनी आणि बडोदा सरकारात १८०२ साली पहिला मित्रत्वाचा करार झाला, तो राजे सयाजीरावांनी अभ्यासला होता. तोच करार पुढे ब्रिटिश सरकारने स्वीकारल्याने आपण वरिष्ठ सरकारचे मांडलिक नसून बडोद्याचे सार्वभौम राजे आहोत, ही भावना सयाजीरावांच्या मनात पक्की रुजली होती.
या काळात अरविद घोष हे बंगाली क्रांतिकारक सयाजीरावांचे खाजगी सचिव होते. राजे सयाजीरावांनी कर्झन यांना पत्राने कळविले, “मी तुमचा नोकर राही. मी ब्रिटिश सरकारचा मित्र आहे. आमच्या फिरण्या-वागण्यावर बंधने घालण्याचा आपणास अधिकार नाही.”
कर्झनसारख्या गव्हर्नर जनरलशी सयाजीराबांनी जो संघर्ष केला; त्यांच्या हिमतीला तोड नाही, असे सयाजीराबांच्या पदरी सदतीस वर्षे नोकरी केलेल्या रियासतकार गो.स. सरदेसाई यांनी लिहून ठेवले आहे.
अनेक गोष्टी सयाजीराबांनी हिंदुस्थानात प्रथम केल्या आहेत. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करून शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची सुरुवात करणारे ते हिंदुस्थानात पहिले आहेत. त्यांनी पहिल्यादा शेतीखाते सुरू केले. शेती मालांना चांगले दर मिळावे म्हणून शेतकरी पतपेढ्या सुरू केल्या. शेतकऱ्यांचा पहिला सहकारी कारखाना मांडी येथे उभारला .
राजे सयाजीराव गायकवाड हे त्याकाळातील एक विचारवंत राजे होते.आयुष्यभरात ते कोणत्याही व्यसनाचे शिकारही झाले नाहीत, जनकल्याणातच माझा मोक्ष आहे असे ते सागत त्यांनी जगभर प्रवास आणि उत्तम पुस्तकांच्या संगतीचे आयुष्य घालवले. विद्वान माणसांचा संच आणि जगातील सर्व विषयांच्या पुस्तकांचा संग्रह त्यांनी जमवला.
जगातील पहिल्या विमान बांधणीस आणि प्रयोगास मदत केली. हे आपणास माहीतच नाही, तळपदे नावाचे संस्कृत पंडित पुण्यात राहत होते . त्यांनी विमानाचा प्रकल्प तयार केला, न्यायमूर्ती रानडे तळपदेना घेऊन बडोसद्यास गेले. सयाजीरावांनी महत्त्व ओळखून या प्रकल्पास अर्थसाहाय्य केले . एप्रिल १८९५ साली. मुंबईच्या चौपाटीवर पहिल्या मानवरहित विमानाने पहिले उड्डाण केले गेले सयाजीराव आणि रानडे या प्रयोगास जातीने हजर होते. ब्रिटिश सरकार या प्रयोगाने बिथरले. दुसर्या दिवशी तळपदेंना अटक झाली. तळपदेना मनोरुग्ण ठरविले. रानडे-सयाजीरावांना समज दिली. यानंतर आठ वर्षांनी राइट बंधूंनी विमान उड्डाणाचा प्रयोग केला. जगातील पहिल्या विमानउड्डाणाची व भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्याला मदत करणार्या सयाजीरावांची कोठेही नोंद नाही, हा दुर्दैवी इतिहास आहे.
राजांनी साठ वर्षे सलग राज्य केले . साठ वर्षांच्या हीरक महोत्सव कार्यक्रम त्यांच्या चाहत्यांनी साजरा केला .या कार्यक्रमासाठी देशभरातील मान्यवरास निमंत्रणे गेली. शहराबाहेर मैदानात मोठा शामियाना उभारला होता. महाराज आणि महाराणींचा सजवलेला रथ सभेच्या ठिकाणी आला. महाराजांचे स्वागत झाले. प्रजाजनांचे प्रेम आणि आदराने त्यांना गहिवरून आले .सर्वांवर नजर फिरवून महाराज शांतपणे बोलू लागले,
“आम्ही साठ वर्षांपूर्वी कवळाणा जन्मगावाहन बडोद्यात आलो. राजा बनलो. नंतर शिकलो. शिक्षणाने आम्हाला तिसरा डोळा लाभला. ते शिक्षण आम्ही प्रजेला. दिलं. अज्ञान आपला आहे. शिक्षणाने त्यावर मात करा. प्रजाकल्याणातच आम्ही मोक्ष शोधला. देशासाठी एकी हवी. जातिधर्माची भांडणं आपण सोडली पाहिजे . देशाचे आणि आपले चारित्र्य निष्कलंकित हवे. आम्ही आमच्या परी ते जपले. नियम मोडले की शिक्षा होते. निसर्गातही असेच घडते. दुष्काळ आणि अवर्षण ही शिक्षाच आहे. पाणी सोन्याहन मौल्यवान आहे. जपून वापरा. संपल तर कशानेही विकत मिळणार नाही. खुळ्या चालीरीती सोडा. शिक्षणाने आणि ज्ञानाची कास धरा. ग्रामविकास हेच राष्ट्रकार्य आहे, शेतीउद्योग आमच्या देशाचा प्राण आहे. कारभाऱ्याने ह्याचे ध्यान ठेवावे. आज जग झपाट्यानं पुढं जात आहे. आपण मागे राहता कामा नमे. विकसित देशांबरोबर येण्यासाठी शिक्षण आणि विज्ञान हाच मार्ग आहे. ह्याची कास धरली नाही, तर आपण जगाच्या पन्नास-साठ वर्ष मागे पडू. बलसंपत्न भारताचे माझे स्वप्न आहे. एकेकाळी भारत संपन्न, बलशाली देश होता. ते वैभव पुन्हा मिळावे. ते आमचे तरुण-तरुणीच पूर्ण करतील. ही मुलेच आमची खरी संपत्ती आहे. त्यांना मी एक यशाचा मंत्र सांगत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ही चार सूत्रे अंगीकारावी , स्वत:ला झोकून देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करा ,त्याला प्रामाणिक पणाची जोड द्या, देशप्रेम विसरू नका आणि शेजार्याशी बंधुभावाने बागा. यातूनच उद्याचा बलसंपन्न भारत घडणार आहे .”