हिंदू धर्मातील विविध पंथ संप्रदाय

हिंदू धर्मातील विविध पंथ  संप्रदाय

वैष्णव संप्रदाय

हिंदू धर्मातील विविध पंथ संप्रदाय

विष्णूला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या  पंथाला किंवा संप्रदायाला ‘वैष्णव संप्रदाय’ असे म्हणतात. हा संप्रदाय व्यापक अर्थाने भागवत धर्म’ या नावाने ओळखला जातो. वेदवाड्मयात विष्णूला ‘त्रित्रिक्रम’ (तीन पावलांमध्ये  विश्‍व व्यापून टाकणारा अर्थात वामनावतार) म्हटले गेले. त्यानंतरच्या काळात विष्णू हा यज्ञरूप आणि सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहे, अशी श्रद्धा निर्माण झोली. ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात या श्रद्धेचे मूळ आहे. विष्णूने वेळोवेळी दहा अवतार घेऊन पृथ्वीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आपली विधायक भूमिका निभावली, असा लोकविश्‍वास आहे. 

पृथ्वी वर प्रलय झाला तेव्हा मत्स्यावतार घेऊन मनूचे (मानवाचे) रक्षण केले, देव-दानव युद्धात समुद्रमंथन प्रसंगी कूर्मावतार धारण करून पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी वराहावतार, प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंहावतार, तीन पावलांमध्ये बळिराजाला पाताळात लोटण्यासाठी वामनावतार, सहतस्त्रार्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी परशुरामाबतार धारण केला. तसेच रावणाच्या विनाशासाठी घेतलेला रामावतार, कंसाच्या विनाशासाठी कृष्णावतार, यज्ञ हिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसा तत्त्व जगाला सांगण्यासाठी बुद्धावतार धारण केला. शिवाय दुष्ट शक्‍तींचा नाश करून धर्म स्थापना करण्यासाठी कलियुगाच्या अखेरीस विष्णूचा कल्की अवतार हा दहावा अवतार होईल असे कल्की पुराणात म्हटले आहे.

हरिवंश, विष्णुपुराण, भागवत ग्रंथ हे वैष्णव संप्रदायाचे प्रमुख ग्रंथ आहेत. सर्वसाधारणपणे गुप्त साम्राज्यात (इ.स. ३०० ते ५५०) वैष्णव संप्रदायाचा उदय झाला असे मानले जाते. याचकाळात हिंदू, बौद्ध आणि जैन हे तिन्ही धर्म प्रचलित झाले. हिंदू धर्माच्या पुनर्घटनेचे कार्य प्रगतीपथावर होते. या काळात वैदिक धर्माची तत्त्वे सामान्य लोकांना समजावी म्हणून मनस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती असे अनेक स्मृतिग्रंथ लिहिले गेले.

रामायण आणि महाभारत ग्रंथांना गुप्त काळात सध्याचे रूप प्राप्त झाले. त्रिदेव संकल्पना (ब्रह्मा, विष्णू आणि शिव) रूढ झाली. अवतार कल्पनेनुसार वराह, वामन, नरसिंह, राम, इत्यादी विष्णूच्या अवतारांची पूजा प्रचारात आली. वैदिक यज्ञयाग मागे पडून पौराणिक धर्माचे अनुकरण वाढले. दैनिक उपासनेमध्ये भक्तीला प्राधान्य मिळू लागले. स्वतः गुप्त राजे हिंदू धर्मातील भागवत धर्माचे ( वैष्णव संप्रदायाचे) अनुयायी होते. त्यामुळे वैष्णव संप्रदायाला महत्त्व प्राप्त होऊने त्याचा बंगाल, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात विशेष प्रसार झाला. 

दक्षिण भारतातील आळवार भक्‍त 

तमीळ भाषिक वैष्णव संतकवींच्या परंपरेला आळवार असे म्हणतात. आळवार म्हणजे ईश्वराच्या प्रेमसागरात बुडून गेलेला भक्‍त होय. हे आळवार इ.स. ५०० ते ८०० या काळात होऊन गेले. दक्षिण भारतातील वैष्णव सांप्रदायिक बारा आळववारांना आचार्यांपेक्षा अधिक मान देतात. बाराआळवारांनी रचलेली सुमारे चार हजार पद्ये दिव्य प्रबंधम्‌’ (अरूळिच्वॅयल) यां नावाने नाथमुनींनी नवव्या शतकात संकलित केली. आजही दक्षिण भारतातील वैष्णव मंदिरांमध्ये त्यांचे गायन केले जाते. हा ग्रंथ वैष्णव सांप्रदायिक वेदाइतका पवित्र मानतात.

वरील बारा आळवारांमध्ये सर्व जाती वर्णाचे लोक समाविष्ट होते. आंडाळ आळवार ही एक स्त्री असून  तिला “दख्खनची मीरा’ म्हटले जाते. जो सर्वभावे ईश्वराला शरण जातो त्याचे ईश्‍वर रक्षण आणि उद्धार करतो, असा ईश्‍वरभक्तीचा साधा सुलभ मार्ग आळवारांनी सांगितला. भारतात भक्‍तिपंथाची सुरुवात आळवारांनी केली असे एक मत असून आळवारानंतर झालेल्या “आचार्य परंपरे’ने वैष्णव संप्रदायाच्या भक्‍तिपंथाचे तत्त्वज्ञान विकसित्त केल्याचे मानले जाते. नाथमुनी, यमुनाचार्य, रामानुजाचार्य, निंबाकाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, गौरांग चैतन्य महाप्रभू, स्वामी रामानंद या आचार्यांनी इसवीसनाच्या नवव्या शतकापासून भारतात वैष्णव संप्रदायाचा विकास केला. उत्तर आणि दक्षिण भारतातील भक्‍ती आंदोलनांना एकत्रित करणारा दुवा म्हणून स्वामी रामानंदांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय 

भागवत धर्म किंवा वैष्णव संप्रदायान्तर्गत ज्यांचा समावेश होतो असे काही उपासना पंथ महाराष्ट्रात निर्माण झाले. त्यामध्ये

(१) वारकरी, (२) महानुभाव, (३) समर्थ हे प्रमुख आहेत.

वारकरी संप्रदायाने उपास्य दैवत मानलेला विठ्ठल हा कृष्णस्वरूप आहे. महानुभाव पंथात कृष्णोपासना केली जाते. विष्णूचा अवतार असलेल्या रामाची उपासना समर्थ संप्रदायात केंद्रस्थानी मानली जाते. या तीन उपासना पंथांनी महाराष्ट्राच्या प्रादेशिक सीमा कमी अधिक प्रमाणात ओलांडल्या.

 

शैव संप्रदाय

“शिवा” ला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या पंथ किंवा संप्रदायाला ‘शैव संप्रदाय’ असे म्हणतात. शिवा हा संपूर्ण भारतात सर्व जाती-जमातींकडून पूजला जाणारा “महादेव’ आहे. शैव संप्रदायांतर्गत पाशुपत पंथ, अघोरी पंथ, कापालिक पंथ, नाथ संप्रदाय, काश्मिरी शैव, नयन्मार शैव, विर॑ शैव (किंवा लिंगायत) या उपपंथांनी भारतभर शिवसंप्रदायाचा प्रसार केला.

वेद वाड्मयात ‘रुद्र’ या देवतेची स्तुती करणारी तीन सूक्ते आढळतात. डॉ. मॅक्डोनल यांनी ‘रुद्र’ आणि ‘अग्नी’ यांच्यातील साम्यावरून ‘रुद्र’ हा विनाशकारी झंझावाताचे प्रतीक असल्याने म्हटले आहे. डॉ. रा. गो. भांडारकर यांनीही ‘रुद्र’ देवतेला सृष्टीतील विध्वंसक शक्तीचे प्रतीक म्हटले आहे. अर्थर्ववेदात रुद्राला ‘पशुपती’ आणि ‘महादेव’ ही विशेषणे भ्रथमच लावण्यात आली. त्यानंतरच्या काळात त्याला ‘शिव’, “शिवतर’, ‘शंकर’, ‘गिरिकांत’, ‘गिरीश’, इत्यादी नावे देण्यात आली. वैदिक रुद्रालाच ‘अग्नी’ या अर्थाने पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्यौ या तीन ठिकाणी जन्मणारा म्हणून ‘त्र्यंबक’ असे नाव प्रचलित झाले.

भारतात शिवाची उपासना प्रामुख्याने लिंग स्वरूपात केली जाते. त्याचे मूळ सिंधू संस्कृतीत आढळते. शिवलिंग हे जननेंद्रियाचे प्रतीक आहे. वैदिकांनी वैदिकेतरांची (सिंधू संस्कृतीतील लोकांची) लिंगोपासना आत्मसात केली आणि तीच पुढील काळात भारतीय संस्कृतीत रूढ झाली. रामायण ग्रंथात शिवाची महादेव, महेश्वर, शंकर, त्र्यंबक, इत्यादी नावे आढळतात. तर महाभारत ग्रंथात शिवाच्या प्राप्तीचे मार्ग म्हणूनं योग आणि तपश्‍चर्या या साधनांना महत्त्व दिलेले आहे.

पौराणिक वाड्मयात “शिव’ आणि ‘पार्बती* यांच्या ऐक्याचे तत्त्वज्ञान मांडलेले असून त्यांच्या उपासनेचा भक्तिमार्ग कथन केला आहे. याच काळात भारतात अनेक शिव मंदिरे स्थापन होऊन त्यांच्यात शिवलिंगाचे पूजन होऊ लागले.

सोमवार हा शिवाचा वार, त्याला बेलपत्र वाहावे, त्याच्यासाठी उपवास करावे, त्याच्या नावाने कपाळावर आडवे गंथ लावावे, त्याला अभिषेक करावा आणि त्याप्रसंगी रुद्रपाठ म्हणावा,

इत्यादी व्रतवैकल्ये पुराण काळापासून रूढ झाली.इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत शिवाच्या उपासनेत विविधता आली. तो ‘दक्षिणामूर्ती’ , “महेशमूर्ती’, ‘त्रिमूर्ती’, महासदाशिव’, “अर्धनारी नटेश्‍वर’, “महाकाल’, ‘नटराज’, इत्यादी विविध रूपांमध्ये वेगवेगळ्या ‘लोकसमूहात मान्यता पावला. महाराष्ट्रातील ‘मल्लारी’, “मार्तंड’, ‘खंडोबा’, ‘ज्योतिबा’, ‘रवळनाथ’ ही शिवाचीच रूपे (अवतार) आहेत. कर्नाटकात त्याला ‘मैलार’ म्हणतात.

म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतांतील शिवोपासकांना पवित्र वाटणारीशिवमंदिरे ‘बारा ज्योतिर्लिंगे’ म्हणून सर्व परिचित आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन, त्यांची यात्रा करणे हे पुण्यप्रद मानले जाते. सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ, आंध्रातील मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशात उज्जैन येथील महाकालेश्वर आणि नर्मदेकाठचे ओंकारेश्वर, उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, महाराष्ट्रातील भीम शंकर, त्र्यंबकेश्‍वर, परळी वैजनाथचे वैजनाथ, हिंगोलीचे नागेश्वर, वेरुळचे घृष्णेश्वर आणि तामीळनाडूचे रामेश्‍वर अशी महादेवाची भारतभर पसरलेली ज्योतिर्लिंगे आहेत.

शैव संप्रदायाची वरील बारा ज्योतिर्लिंगे भारतातील विविधतेतील एकता व्यक्‍त करणारी आहेत. पर्वतराज हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत विविध प्रांतांत त्यांची स्थापना झाली. काही ज्योतिर्लिंगे पवित्र नद्यांच्या किनाऱ्यावर आहेत. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भांनी ती ओळखली जातात. त्यांच्यावरून भारताची धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता दिसून येते.

 

शैव संप्रदायातील विविधता

शैव संप्रदायात एका शिवाचीच उपासना केंद्रस्थानी आहे. त्यामुळे सर्व प्रमुख शैव संप्रदायाचे

(१) पाशुपत आणि

(२) आगमिक

असे मुख्य प्रकार पडतात. पाशुपताबरोबर अघोर कापालिक आणि नाथ संप्रदायांचा उल्लेख केला जातो. आगमिक प्रकारात काश्मिरी शैव मत, कर्नाटकातील लिंगायत किंवा वीरशौव आणि तामीळनाडूमधीळ नायन्मार यांचा समावेश होतो. शैव संप्रदायातील वरील पंथोपपंथ इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत निर्माण झाले.

 

(१) पाशुपत पंथ

गुजरातमधील कायारोहण क्षेत्रात होऊन गेलेला लकुलीश किंवा नकुलीश हा शिवाच्या अठरा अवतारांपैकी आद्य असून त्याने पाशुपत मताची मांडणी केली. शैव संप्रदायात पाशुपत पंथ हा सर्वात प्राचीन असल्याचे मानले जाते. मानवी जीवनातील दुःखान्त ज्ञान आणि वैराग्या मुळे होत नसून केवळ शिवप्रसादाने होतो, अशी या पंथाची श्रद्धा आहे. शिव हाच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणतो; म्हणून ज्याला दुःखान्त हवा त्याने शिवाची उपासना करावी, अशी या संप्रदायाची धारणा आहे. पाशुपतांच्या धार्मिक आचारात भस्माला विशेष महत्त्व आहे. भस्मस्नान म्हणजे खरा यज्ञ होय असे ते मानतात, ‘ओम नमः शिवाय’ हा शिवमंत्र, विभूती आणि रूद्राक्ष धारण करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य मानले जाते.

 

(२) अघोरी पंथ

या पंथात शिवाची अघोरीश्वर म्हणून उपासना,केली जाते. त्याचा उगम गुजरातमध्ये अबू येथे झाला. चांमुडा ही  या पंथाची देवता असून तिला नरबळी देण्याची प्रथा होती. जादुटोणा आणि मंत्र तंत्राला या पंथात विशेष महत्त्व आहे. अठराव्या शतकातील किनराम यांनी लिहिलेला “विवेकसार* ग्रंथ या पंथात प्रमाण मानला जातो. सध्या या पंथियांची संख्या थोडी असून ती भारतभर विखुरलेली आहे.

 

(३) कापालिक पंथ

कपाली म्हणजे मानवी कवटी धारण करणारा शिव या पंथात पूजला जातो. अशा शिवाचे उपासक कापालिक म्हणून ओळखले जातात. त्यांचे मुख्य केंद्र शैल पर्वत होते. या पंथाचे अनुयायी मानवी कवटी बाळगून तिच्यातून अन्न, मद्य, मांस यांचे सेवन करतात. नरबली, स्मशानवास, मद्य, मांस सेवन हा या पंथाचा आचार आहे. कापालिक पंथाचा फारसा विस्तार झाला नाही. शंकराचार्यांनी त्यांच्याशी वाद करून त्यांना पराभूत केले. त्यामुळे त्यांच्या उपासनेला मोठ्या प्रमाणात पायबंद बसला.

 

(४) नाथ संप्रदाय

‘नाथ संप्रदाय हा भारतभर पसरलेला एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय आहे. त्याचा उगम इसवी सनाच्या आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळात झाला. हा शैव तत्त्वज्ञानावर आधारित संप्रदाय असून आदिनाथ परमेश्‍वर शिव त्याचा उद्गाता आहे. अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. नाथ म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा सांप्रदाय होय. योगमार्गाने सिद्धावस्था प्राप्त करून घेणे हे या संप्रदायातील साधकांचे ध्येय मानले जाते. हा संप्रदाय ‘सिद्ध संप्रदाय’, ‘योग संप्रदाय’ , “अवधूत संप्रदाय’, ‘गुरू संप्रदाय’, इत्यादी विविध नावांनी ओळखला जातो.

नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष

या संप्रदायात नऊ या संख्येला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. त्यावरून नवनाथ हा शब्द सर्वपरिचित झाला आहे. ‘गोरक्षसिद्धान्त संग्रह’, ‘नवनाथ भक्तीसार ‘ हे नाथ सांप्रदायिकांचे पवित्र ग्रंथ आहेत. ‘गोरक्षसिद्धान्त संग्रह* या ग्रंथात नवनाथांच्या दोन गणना याद्या) पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत.

१) आदिनाथ, (२) मत्स्येंद्रनाथ, (३) उदयनाथ, (४) दण्डनाथ, (५) सत्यनाथ, (६) संतोषनाथ,

(७) कूर्मनाथ, (८) भवनार्जि (९) गोरक्षनाथ. (आ) (१) गोरक्षनाथ, (२) जगन्नाथ, (३) जालंदरनाथ,

(४) नागार्जुन, (५) सहस्त्रार्जुन, (६) दत्तात्रेय, (७) देवदत्त, (८) जडभरत, (९) मत्स्येंदर, –

पैकी मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे कार्य महत्त्वपूर्ण

आहे. त्यांचा काळ अनुक्रमे ९ वे १०वे शतक आणि १० वे ११ वे शतक असा मानला जातो. आदिनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली.

नाथ संप्रदायाचे सिद्धान्त आणि साधना . नाथ संप्रदायात पुढील महत्त्वाचे सिद्धान्त आहेत.

(१) शाक्‍तियुक्‍त शिव हेच अंतिम सत्य आहे.

(२) शिव आणि शक्‍ती अभिन्न आहेत.

(३) जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे.

(४) पिंड आणि ब्रह्मांड यांचे ऐक्य म्हणजे सिद्धावस्था होय.

(५) योगसाधनेत गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे.

नाथ संप्रदायात शिवोपासनेला सर्वोच्च स्थान आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय, भैरव, कालभैरव, अंबा, जगदंबा ही त्यांची काही उपास्यदैवते आहेत. नेपाळमध्ये मत्स्येंद्रनाथांची अवलोकितेश्वराच्या रूपात पूजा केली जाते. गोरक्षनाथांची मंदिरे भारतात अनेक ठिकाणी आहेत.

नाथ संप्रदायात (१) जोगी (२) अवधूत (३) कानफाटे, इत्यादी शाखा आहेत. हे सांप्रदायिक कुंडलिनी शक्‍ती जागृत करून समाधी स्थिती प्राप्त करण्याची साधना करतात. ते मंत्रयोग, इहयोग, लययोग आणि राजयोग या चार योगांचे आचरण करतात.

शिवाला कुल नाही, तो निर्गुण-निरंजन आहे. त्यामुळे ईश्वरतत्त्व हे कुल, जात, वर्ण आणि धर्म यापलीकडे आहे ही नाथपंथाची मुख्य शिकवण होती. प्रखर वैराग्य, विशुद्ध चरित्र, सदाचार आणि ब्रह्मचर्य यांना महत्त्व देऊन या पंथियांनी तत्कालीन समाजातल्या अनैतिक, अनाचारी प्रवृत्तींना आळा घातला. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गोरक्षनाथांनी पाया घातला, त्यांच्या कार्यातून कबीर, ज्ञानेश्‍वर आदि संतांनी प्रेरणा घेऊन धर्मप्रेरणणेतला मानवी मूल्यांचा, समता-बंधुभावाचा पाया विस्तृत केला.आगमिक वर्गातील शैब संप्रदाय

वैष्णव, शैव, शाक्त, इत्यादी संप्रदायांनी आपापल्या आचार विचारांच्या मार्गाचा आधार म्हणून जे साहित्य निर्माण केले त्यास ‘*आगम’ असे म्हणतात. (वैदिक धर्माच्या अशा साहित्याला “निगम’ म्हणतात.) शैव संप्रदायातील जे पंथ “ज्ञान’, ‘योग’, ‘क्रिया’ आणि ‘चर्या’ यांच्या संदर्भात विशिष्ट तत्त्वज्ञान मांडतात त्यांचा ‘आगमिक वर्ग” मानला जातो. त्यात काश्मिरी शैव, नयन्मार शैव, वीरशैव (किंवा लिंगायत) यांचा समावेश होतो.

(१) काश्मिरी शैवमत : इसवी सनाच्या आठव्या शतकात काश्मीरमध्ये वसुगुप्त याने ‘शिवसूत्र’ आणि ‘स्पंदन कारिका’ हे ग्रंथ लिहून एका नव्या शैवमताची स्थापना केली. या मतानुसार शिव हा सर्वशक्तिमान असून तो आपल्या इच्छेप्रमाणे जगाची उत्पत्ती आणि प्रलय घडवतो. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात भेद नसून परमात्म स्वरूपाच्या ज्ञान प्राप्तीसाठी शिवभक्ती हा उपाय आहे. पुढे दहाव्या शतकात सोमानंद याने ‘प्रत्यभिज्ञा’ हे नवे शैवमत प्रस्थापित केले. त्यासाठी शिवदृष्टी’ हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. शिवाची नितांत उपासना केल्यावर साधकाच्या मनात ‘मीच शिव आहे’ अशी प्रत्यभिज्ञा (जाणीव) निर्माण होते. काश्मिरी शैवमत योग साधनेवर विशेष भर देते.

(२) नायन्मार शैव संत : दक्षिण भारतातील त्रेसष्ट शैव संतांना “नायन्मार’ (धनी किंवा देव) म्हटले जाते. हे नायन्मार इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत होऊन गेले. ते सर्व विविध जाती धर्माचे होते. त्यांच्याविषयी सर्वसामान्य माणसे आजही आदर व्यक्‍त करतात. नायन्मारांनी शिवभक्‍तीपर विपुल काव्यरचना केली. पुढील चार नायन्मार महत्त्वाचे मानले जातात.

१) अप्पर : हा शूद्र कुळातील होता. (२) सुंदरर : हा ब्राह्मण होता. (३) माणिक्क बाचकर : हा मदुरेचा प्रधान होता. (४) ज्ञान संबंधर : याने बालपणापासून शिवभक्तीपूर्ण काव्यरचना केली. शेक्किळार या शैवसंताने बाराव्या शतकात ‘पेरियपुराणम्‌? या ग्रंथात सर्व त्रेसष्ट नायन्मारांची चरित्रे लिहिली. या ग्रंथ तमीळ शैव पंथात पवित्र मानला जातो. सर्वांवर प्रेम करावे, समाजसेवेसाठी आपले जीवन अर्पण करण्याची सिद्धात ठेवावी, अहिंसा पाळावी, प्रत्येकाला व्यक्‍्तीविकासाची संधी द्यावी, स्त्रियांना स्वातंत्र्य द्यावे असे या शैवमताने मांडलेले उदात्त सिद्धान्त आहेत.

(४) लिंगायत संप्रदाय किंवा विरशैवपंथ : ज्या काळात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा विकास होत होता त्याच काळात, इसबी सनाच्या बाराव्या शतकात कर्नाटकात लिंगायत संप्रदाय उदयाला आला. वारकरी संप्रदायाला वैष्णव विचारांचे तर लिंगायत संप्रदायाला शैव विचारांचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्याचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण भारतात झालेला आहे. या संप्रदायाचे अनुयायी आपल्या अंगावर शिवलिंग धारण करतात म्हणून त्याला लिंगायत संप्रदाय म्हणतात. हा संप्रदाय “वीरशैव संप्रदाय” म्हणूनही ओळखला जातो. त्याचे आणखी नाव ‘शिवशरण संप्रदाय’ असेही आहे.

शिव हा सर्वशक्तिमान आहे, जीव हा शिवाचा अंश आहे, झाडाला जसे फूल व फळ येते तशी शिवापासूनच जगत उत्पन्न झाले आहे असे हा पंथ मानतो. जगाची उत्पत्ती वा विनाश होतो ही कल्पना वीरशैवांना मान्य नाही. जगाचा शक्‍तिविकास किंवा शक्‍तिसंकोच होतो हे त्यांचे मत आहे. ‘ओम नमो शिवाय” हा एकमेव उपासना मंत्र या पंथाने स्वीकारला. भकक्‍तिमार्गाचे सहा टप्पे (षटस्थल) नैतिक जीवनाचे पाच आचारधर्म (पंचाचार) आणि साधनेचे आठ संस्कार (अष्टावरण संस्कार) सांगून वीरशैवांनी आपल्या पंथियांना सदाचरणाची शिकवण दिली.

अलीकडेच कर्नाटकात सापडलेल्या दोन ताप्रपटांवरून रामय्या आणि बसवेश्वर यांनी लिंगायत संप्रदायाची स्थापन केली असे सिद्ध झाले. त्यांचा कालखंड इसवीसनाचे बारावे शतक आहे. या दोहोंपैकी रामय्या हे संप्रदायाचे संस्थापक आणि बसवेश्वर सुधारक असल्याचे सर्वमान्य झाले आहे.

बसवेश्वरांनी विरता स्वीकारून शैव पंथातील अनेक विकृती दूर केल्या. लोकांना शिव भक्‍तीकडे आकर्षित करण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले.

कर्नाटक या आपल्या कर्मभूमीत बसवेश्वरांनी (११३१-११६७) लिंगायत संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, साहित्य, राजकारण, इत्यादी क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारक कार्य केले. त्यांना वर्णभेद, वर्गभेद, यज्ञयागातील पशुहत्या मान्य नव्हती. ‘शिव’ हाच एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून त्यांनी शिवोपासनेचा पुरस्कार केला. एकाच देवाची भक्‍ती करा, भूतदया दाखवा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.

बसवेश्वरांनी कल्याण (कर्नाटक राज्य) येथे स्थापन केलेली ‘शिवानुभव मंटप? ही संघटना धर्मांच्या जागतिक इतिहासातील एक अनन्यसाधारण संस्था मानली जाते. तिथे वेगवेगळ्या जाती, धर्म, व्यवसायातील लोक आणि अनुयायी एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत. या माध्यमातून त्यांनी लोकजागृती घडवून आणली. चातुर्वण्य व्यवस्थेला आव्हान देऊन आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहाराला बसवेश्वरांनी उत्तेजन दिले. त्यांनी बालविवाहांना विरोध करून विधवा विवाहांचा पुरस्कार केला. आपल्या संप्रदायात त्यांनी सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरुषांना प्रवेश दिला. काश्मीरपासून केरळपर्यंत मठ स्थापना करून बसवेश्वरांनी समर्थ संघटनशक्‍्ती

निर्माण केली. ‘शारीरिक श्रम हाच कैलास (स्वर्ग) आहे असा त्यांचा एक महान सिद्धान्त होता. त्याला ‘कायकबे कैलास’ असे म्हणतात. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला वाव नव्हता. मोक्षासाठी अरण्यात जाण्याची गरज नाही असे ते मानत. ज्ञानेशवरांप्रमाणे बसवेश्वरांनी ग्रंथनिर्मितीसाठी लोकभाषा कन्नडचा स्वीकार केला.

अल्लमप्रभू (इ.स. १२ वे शतक) यांनी वीरशैव संप्रदायाचा प्रसार केला आणि तत्कालीन रूढी, अंधश्रद्धा,

अज्ञान यावर कठोर टीका करून समाजात विवेकनिष्ठ जाणीव- जागृतीचे कार्य केले. त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर बसवेश्वरांनी वीरशैवांच्या धार्मिक संघटनेच्या (शिवानुभव मंटप) अध्यक्षस्थानी नियुक्‍त केले.

सारांश, वीरशैव संप्रदायाने जाती-धर्मातील विषमता दूर करून, त्यांच्यातली तेढ घालवून रोटी-बेटी व्यवहार घडविण्यापर्यंत प्रागतिक पाऊल टाकले. श्रमनिष्ठा हे धर्ममूल्य म्हणून रुजविले हा प्रगत विचार नवा होता.

महानुभाव संप्रदाय

महाराष्ट्रात उगम पावून मध्य भारत, पंजाब, काबूल कंदाहारापर्यंत प्रसार पावलेला “महानुभाव संप्रदाय’ हा एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. त्याचा प्रारंभ चक्रधरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केला. हा संप्रदाय प्रारंभी ‘महात्मा पंथ’ “परमार्ग’, ‘भटमार्ग’ या नावाने ओळखला जात असे. या संप्रदायाला पंजाबात ‘जय कृष्णी पंथ’ तर गुजरातेत ‘अच्युत पंथ’ असे म्हणतात. या संप्रदायात कृष्णोपासना आणि दत्तोपासना केली जाते. गीता आणि भागवत हे ग्रंथ प्रमाणग्रंथ आहेत. हा द्वैतवादी संप्रदाय असून संन्यास मार्गावर अधिक भर देणारा आहे.

महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा

हे तत्त्वज्ञान द्वैतवादावर आधारित म्हणजे परमेश्‍वर आणि भक्त वेगवेगळे असतात असे मानणारे आहे. चक्रधरांनी “ज्ञीव’, ‘देवता’, ‘प्रपंच’ आणि ‘परमेश्‍वर’ हे चार स्वतंत्र ‘ पदार्थ मानले. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे –

(१) जीव : जीव अनंत असून परमेश्वराच्या ज्ञानाने किंवा भक्तीने त्यांना मुक्‍ती मिळते. जीवाला मिळणारा मोक्ष कोणत्याही कर्मराहाटीचे फळ नसते.

(२) देवता : देवता अनंत असून त्यांचे ८१ कोटी, सव्बा लाख दहा या संख्येचे देवताचक्र आहे. दत्तात्रेय व भगवान कृष्ण या दोन देवता सोडल्यास इतर देवता नित्यबद्ध आहेत. जीवांना त्यांच्या कर्माची फळे देणे हे त्यांचे कार्य आहे.

(३) प्रपंच : प्रपंचाचे कारणरूप आणि कार्यरूप असे भेद पडतात. तो त्रिगुणात्मक (सत्त्व, रज, तम युक्‍त) आणि पंचभौतिक (पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाशयुक्‍त) आहे. कारणरूप प्रपंच अव्यक्त, अनादी आणि अनित्य असून कार्यरूप प्रपंच अनित्य आणि मिथ्या आहे.

(४) परमेश्‍वर : ब्रह्म, माया आणि ईश्‍वर मिळून परमेश्‍वर होत असून तो अनादीनित्य स्वतंत्र पदार्थ आहे. तो सत्‌ चित्‌ आणि आनंद या तीन लक्षणांनी युक्‍त आहे. परमेश्‍वर देहधारी अवतार घेऊन जीवांचा उद्धार करतो.महानुभाव तत्त्वज्ञानानुसार मुक्‍तीनंतरही जीवाचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहते. त्याच्या उद्धाराचे ज्ञान आणि भक्‍ती असे दोन मार्ग आहेत. ज्ञान प्राप्त. झाल्यानंतर जीवाने सर्व संग परित्याग करून ‘अनुसरण’ करावे. त्याने पुढील द्वादश धर्माचा त्याग करावा. (१) देशधर्म, (२) ग्रामधर्म, (३) जातीधर्म, (४) कुळधर्म, (५) वर्णधर्म, (६) आश्रमधर्म, (७) पुराणधर्म, (८) आगमधर्म, (९) प्रवृत्तीधर्म (१०) निवृत्तीधर्म, (११) युगधर्म, (१२) राज्यधर्म.

ज्ञानापेक्षा भक्‍ती श्रेष्ठ आहे, अशी महानुभाव संप्रदायाची श्रद्धा आहे.

महानुभाव संप्रदायाचा आचारधर्म

याला चक्रधरांनी “असती परीचा मार्ग’ म्हटले आहे.(कसे असावे व कसे राहावे याची रीत म्हणजे आचार होय.)

त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

(१) संन्यासप्रवणता : ही चारही वर्णातील स्त्री-पुरुषांसाठी खुली आहे.

(२) निवृत्तीपरता : विषय सुखांचा संपूर्ण त्याग म्हणजे निवृत्तीपरता होय,

(३) भिक्षावृत्ती : भिक्षान्त हे पवित्राचे पवित्र असते.

(४) आहिंसाधर्म: कधीही कोणालाही शब्दानेही दुखवू नये.

(५) स्मरणभक्ती : रात्रंदिवस परमेश्‍वराचे नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा यांचे स्मरण करावे.

(६) गुरुभक्ती : आचार्य (गुरू) साधकाला अनिष्टाकडून इष्टाकडे नेणारा असून तो परमेश्वराची जागा घेऊ शकत नाही.

महानुभाव संप्रदायाची अवतार आणि पंचकृष्ण कल्पना

या संप्रदायात पुढील चार अवतार मानले जातात,

१) कृत युगातील हंसावतार

२) त्रेता युगातील दत्तावतार

३) वापर युगातील कृष्णावतार

४) कलियुगातील चक्रधरायतार

या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात “पंचकृष्ण’ संकल्पना प्रचलित आहे. त्यानुसार (१) भगवान कृष्ण, (२) दत्तात्रेय प्रभू,

(३) चांगदेव राऊळ (४) द्वारावतीचे गोविंद प्रभू, (५) पैठणचे चांगदेव राऊळ म्हणजे चक्रधर हे ‘पंचकृष्ण’ आहेत. आपल्या संप्रदायाचे आदिकारण दत्तात्रेय प्रभूंनी द्वारावतीच्या चांगदेव राऊळांना दर्शन देऊन ज्ञानशक्‍ती दिली. त्यांच्यापासून गोविंद प्रभूंनी आणि गोविंद प्रभूंपासून चक्रधर स्वामींनी उपदेश घेऊन ज्ञानशक्ती मिळविली, अशी सांप्रदायिक धारणा आहे.महानुभाव संप्रदायाचा विस्तार आणि सद्य:स्थिती चक्रधर स्वामी (इ.स. ११९४ ते १२७२) हे एक अत्यंत प्रभाबी संघटक होते. त्यांनी या संप्रदायाची स्थापनाकरून अनेक शिष्य एकत्र केले. लोकभाषा मराठीचा अवलेंब करून समाजातील सर्ब स्त्री -पुरुषांपर्यंत आपला संप्रदाय नेऊन पोचवला. सर्वसामान्यांना एक नव्या भक्‍तीविचार शिकवला.

त्यांच्यानंतर नागदेवाचार्य, बाईदेव बास, कवीश्वर बास, परशराय बास या आचार्यांनी आपल्या परीने संप्रदायाच्या लौकिकात भर घातली. पुढील काळात या संप्रदायात तेरा आम्नाय (शाखा) निर्माण झाले. त्यापैकी उपाध्ये आणि कवीश्वर हे दोन आम्नाय प्रमुख मानले जातात.

विसाव्या शतकात महानुभाव संप्रदायात पुनश्चनवचैतन्य निर्माण झाले असून संप्रदायाचा विस्तार भारतात आणि भारताबाहेर वेगाने झाला आहे. त्याचे तत्त्वज्ञान आजही अबाधित असले तरी काळानुरूप त्यात अनेक परिवर्तनेही झाली आहेत.

महानुभाव संप्रदायाने भारताच्या विविधतेत आणि धार्मिक व सांस्कृतिक वारशात फार मोठी मोलाची भर घातली. या संप्रदायाची उभारणी चक्रधर स्वामींच्या आचारविचारांतून आणि सूत्र वचनांमधून झाली. उत्तर काळात त्यांचे संकलन ‘होऊन संप्रदायाचे तत्त्वज्ञान आकाराला आले. सूत्रपाठ, दृष्टान्त पाठ, स्थानपोथी, इत्यादी ग्रंथांमधून ते विसाव्या शतकापर्यंत आले. त्याचप्रमाणे मराठी साहित्याला समृद्ध करणारे, गतकालीन जीवन दर्शन घडविणारे अंनेक सुंदर ग्रंथ महानुभाव संप्रदायातच निर्माण झाले.

 

वारकरी संप्रदाय

भारतीय जनजीवनात परंपरा ही एक अत्यंत महत्त्वाची शक्ती आहे. ती जुन्या आचार विचारांना नव्या स्वरूपात साकार करते. महाराष्ट्रात उगम पावलेला “वारकरी संप्रदाय’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. वेद कालातील विष्णू देवतेचे पुढे भजनपूजन पुराणकाळात टिकून राहिले. पुढे गुप्त काळात त्यातून भागवत धर्म’ अस्तित्वात आला. गुप्त काळात वैष्णव संप्रदायाची मुहूर्तमढ झाली. यादवकाळात परंपराप्राप्त भागवत धर्म आणि वैष्णव संप्रदायाचे महाराष्ट्रात ‘वारकरी संप्रदाया’त रूपांतर झाले. त्याच्या प्रभावाची परंपरा अबाधित राहून तो आजही टिकून आहे.

पंढरपूर येथील विठ्ठलाची उपासना करणाऱ्या संप्रदायाला “वारकरी संप्रदाय’ असे म्हटले जाते. आषाढी, कार्तिकी, माघी किंवा चैत्र शुद्ध एकादशीला, गळ्यात तुळशीमाला घालून नियमाने पंढरपूरला जाणार्‍याला “वारकरी” असे म्हणतात. हा संप्रदाय ‘वैष्णव धर्म’, ‘वैष्णव संप्रदाय’, “भागवत धर्म’, भागवत संप्रदाय’, ‘माळकरी पंथ’ अशा विविध नावांनी ओळखला जातो.भक्त पुंडलिकापासून हा संप्रदाय सुरू झाला. त्याचा कालखंड अद्यापही एकमताने निश्‍चित झाला नसला तरी तो ज्ञानेश्‍वरांआधी किमान ५० वर्षे होऊन गेला असे मानले जाते.

वारकरी संप्रदायाचा उगम भक्त पुंडलिकाशी संबंधित अशा एका लोककथेशी आहे. तो लोहदंड क्षेत्री (पंढरपूरला) माता पित्याची सेवा करीत असताना भगवान कृष्ण आणि रुक्मिणी विठ्ठल रखुमाईच्या रूपात त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. आपल्या सेवेत खंड पडू नये म्हणून भक्त पुंडलिकाने त्यांच्यासमोर वीट फेकली. तिच्यावर विठ्ठल रखमाई उभे राहिले.

त्याची मातृपितृभक्ती पाहून प्रसन्न होऊन देवाने त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा भक्‍त पुंडलिकाने त्यांना ‘येथेच उभे राहून अज्ञानी जनांचा उद्धार करावा’ असा वर मागितला. त्याच्या इच्छेनुसार देव तेथेच उभे राहिले. अशी ही साधी सरळ लोककथा आहे.

या संदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, धर्मेतिहासाच्या दृष्टीने फार सूचक अशी कथा आहे. ईश्वराकडे पाठ फिरविलेला माणूस माता पित्याची सेवा करतो आणि त्यातच त्याला ईश्‍वर, विश्‍वाचा नियंता प्रसन्न होऊन भेटतो. नैतिक सत्यात विश्वाचे पारमार्थिक सत्य गर्भित असते, असा त्याचा तात्त्विक अर्थ निघतो.’ (महाराष्ट्राची सत्त्वधारा). माउली ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील उदात्त शिकवणीतून वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील जनता जनार्दनापर्यंत अल्पावधीत जाऊन पोचला.

वारकरी संप्रदायाच्या विकासाचे कालखंड

भक्त पुंडलिकाविषयी ऐतिहासिक माहिती निश्‍चित होत नसल्याभुळे वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचे

(१) ज्ञानेश्‍वरपूर्व कालखंड,

(२) ज्ञानेश्वर-नामदेव कालखंड,

(३) भानुदास- एकनाथ कालखंड,

(४) तुकाराम कालखंड आणि

(५) तुकारामोत्तर कालखंड असे कालखंड मानले

जातात. यादृष्टीने संत बहिणाबाईचा अभंग अर्थपूर्ण आहे.

संतकृपा झाली | इमारत फळा आली |

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश |

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान या संप्रदायात ‘गीता’, ‘भागवत’, ‘ज्ञानेश्‍वरी’ , ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकारामांची गाथा’ या ग्रंथांना अत्यंत पवित्र मानले जाते. त्यातील विविध आचार-विचार सूत्रांमधून वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान साकार झाले. त्याची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

 

(१) माउली विठ्ठल : हरिहर ऐक्याचे प्रतीक : हरी (कृष्ण) आणि हर (शिव) यांचे ऐक्य विठ्ठल देवतेत आहे. या श्रद्धेतून वैष्णण आणि शैव संप्रदायाच्या आचार विचाराचा संगम वारकरी संप्रदायात झालेला आहे, हे स्पष्ट होते.

(२) चिद्विलासवाद : याची मांडणी ज्ञानेश्‍वरांनी केली. चित्‌ म्हणजे जाणीव अथवा चैतन्य होय. हे चैतन्य विश्‍वातील नाना पदार्थांच्या रूपाने विनटलेले आहे. सर्वत्र केवळ आतमत्वाचे स्फूरण असून अनुभवात जेव्हा ज्ञाता, ज्ञानविषय आणि ज्ञान ही त्रिपुटी उरत नाही तेव्हा एकरस अमृताचा अनुभव शिल्लक राहतो. तीच एक वस्तू म्हणजे अंतिम तत्त्व होय.

अशेष जग म्हणजे त्या एका वस्तूची प्रभा असते. या विचारसरणीला चिद्‌विलासवाद असे म्हणतात.

 

(३) कर्मयोग : प्रत्येकाने परमेशवरार्पण बुद्धीने कर्माचरण करावे. कर्म त्यागापेक्षा त्याग बुद्धीने केलेले कर्माचरण श्रेष्ठ आहे. चित्त शुद्ध आंणि बुद्धी स्थिर ठेऊन प्राप्त कर्तव्यकर्म पार पाडले पाहिजे.

(४) भक्तियोग : ईश्‍वर विश्वरूपाने भासतो. या ज्ञानाने व्यापक विश्‍वात्मक परमेश्वराची स्वकर्मांनी होणारी भक्‍ती हीच खरी भक्ती आहे. तिला ज्ञानयुक्‍त भक्‍ती असे म्हणतात. भक्तीच्या क्षेत्रात उच्च नीच भाव नसतो. परमेश्वराची मुख्य उपासना म्हणजे सगुण भक्‍ती आहे. तिच्यामुळे आपल्या हृदयात भगवंताची मूर्ती प्रकट होते.

(५) नाम महिमा : नाम महिमा हा भक्तियोगाचा गाभा आहे. नाम हेच देवाचे द्वार असून त्याच्यामुळे चार युक्‍ती (सरूपता-सलोकता- समीपता-सायुज्यता) प्राप्त होतात. नाम हे समाधीचे साधन आहे. तेच कर्म आणि ब्रह्म आहे. नाम- स्मरणामुळे मनावरील इतर विषयांचे संस्कार पुसून आत्म्याचे संस्कार दृढ होतात. ‘रामकृष्ण हरी’ हा वारकरी संप्रदायाचा एक मुख्य मंत्र आहे.

वारकरी संप्रदायाचा आचारधर्म

हा संप्रदाय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विस्तार पावलेला आहे. त्याचा आचारधर्म अत्यंत साधा, सरळ, सोपा आणि सुलभ आहे. तो पुढीलप्रमाणे –

(१) विठ्ठल हे एकमेव दैवत असून सर्वांनी त्याची उपासना करावी.

(२) ‘रामकृष्ण हंरी’ हा मंत्र नेहमी जपावा.

(३) वारीला जाताना गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर गोपीचंदन आणि बुक्का, आणि खांद्यावर पताका वा गवावी,

(४) सत्पात्र गुरुकडून मंत्रदीक्षा घ्यावी.

(५) परस्त्री मातेसमान मानावी.

(६) मांसाहार वर्ज्य करावा.

(७) एकादशीचा उपास करावा.

(८) दररोज हरिपाठ म्हणावा.

(९) भजन कीर्तनांना उपस्थित राहावे.

(१०) वर्षातून एकदा पंढरपूर, आळंदी, इत्यादी तीर्थक्षेत्रांची वारी करावी .

(च) इतर काही संप्रदाय

(१) देवी संप्रदाय (शक्‍ती-संप्रदाय) : या प्राचीन संप्रदायाला ‘शक्तिपूजक संप्रदाय’ असेही म्हणतात. काही शतकांपूर्वी ‘शाक्‍त पंथ’ किंवा ‘शाक्‍त संप्रदाय’ प्रभावी होता, तोही या संप्रदायाशी निगडित आहे. देवी ही शक्‍तीची देवता मानली जाते. इतर देवांप्रमाणे देवीनेही दुष्टांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी अनेक अवतार घेतले. ती महासरस्वती (सत्त्वगुणी), महालक्ष्मी (राजसगुणी) आणि महाकाली (तामसगुणी) या रूपांमध्ये पूजली जाते,

सप्तशती: या ग्रंथात तिच्या तिन्ही रूपांचे दर्शन घडते.देवीच्या उपासनेचे दोन मार्ग सांगितले जातात.

(१) वैदिक उपासनेत नवरात्रोत्सव, गायत्री मंत्र पठण, नित्य आणि नैमित्तिक पूजा यांचा समावेश होतो.

(२) तांत्रिक उपासनेमध्ये कुंडलिनीशक्‍ती जागृत करणे, शक्‍ती आणि शिव यांचे ऐक्य साधणे, वेगवेगळी बीजाक्षर यंत्रे तयार करणे या कृती श्रद्धापूर्वक केल्या जातात. ही उपासना सुक्ष्म आणि कष्टसाध्य आहे. तांत्रिक उपासना करणार्‍या कौल संप्रदायाचा वाममार्गी पंथ अनाचारप्रधान मानला जातो. त्यात पंच मकारांची (मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन) साधना केली जाते. या पंथात देवीला ललिता, महाभैरबी, आनंदभैरबी, त्रिपुर सुंदरी म्हटले जाते. समयाचार या दुसर्‍या पंथात चक्र पूजा महत्त्वाची आहे. या पंथाचे देवीला तारा, मणितारा मानतात. तसेच त्रिकोण, वर्तुळ, चतुष्कोन, इत्यादी आकृत्यांमधून रहस्यमय चक्रे निर्माण करून त्यांची साधना करतात.संपूर्ण भारतात देवी ही एक ग्रामदेवता म्हणून सर्वपरिचित आहे. अमरनाथ (काश्मीर), कांची (तामीळनाडू), कामाख्या (आसाम) या तीन प्रमुख शक्‍्तिपीठांप्रमाणे महाराष्ट्रातही साडेतीन शक्‍तिपीठांना (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंग गड) मान्यता आहे.

 

(२) गाणपत्य संप्रदाय : गणपतीला उपास्यदेवता मानणाऱ्या संप्रदायाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. हा संप्रदाय इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकात उदयाला आला. या संप्रदायाचे पुढील सहा भेद आहेत.

(१) महागणपती, (२) हरिद्रा गणपत्नी, (३) उच्छिष्ट गणपती, (४) नवनीत गणपती, (५) स्वर्ण गणपती, (६) संतान गणपती,

या संप्रदायात गुप्त आणि प्रकट या दोन मार्गांनी उपासना केली जाते. तसेच गणपतीला शिवाचा प्रतिस्पर्धी आणि सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. डब्ल्यू वार्ड यांच्यामते, बंगालमधील ज्या हिंदूंनी गणपतीची ‘विघ्नकर्ता’ या रूपाऐवजी “विघ्नहर्ता” या रूपात उपासना सुरू केली तेच गाणपत्य या नावाने ओळखले जाऊ लागले. गुप्त काळात (इ.स. सहावे शतक) गणपती ‘ही शुभदेवता बनली. त्या आधी गणपतीचे वर्णन काही ठिकाणी विघ्नकर्ता असे होत असे. याच काळात गणपती देवता आणि तिच्या उपासनेचा प्रसार भारताबाहेर तिबेट, चीन, जपान, कोरिया, इत्यादी देशांमध्ये झाला. शंकराचार्यांनी (इ.स. आठवे शतक) गणपतीचा समावेश पंचायतन पूजेत केला.

महाराष्ट्रात अष्टविनायक मंदिरे वेगवेगळ्या गावी असून गाणपत्य संप्रदायात ती पवित्र क्षेत्रे मानली जातात. केरळमधील गणपती मंदिरांना होमपुरे म्हणतात. तेथे गणपतीसमोर नित्य होम केला जातो. दक्षिण भारतात गणपतीची उपासना मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. भारतातील सर्व हिंदूमध्ये गणपतीला शुभकार्यप्रसंगी अग्र पूजेचा मान दिला जातो.गृत्समद क्रषी हे आद्य गाणपत्य असून मुद्गल, भ्रूशुंडी, वरेण्य, हे पुराणकालीन अणि मोरया गोसावी, गोसावी नंदन, गणेश योगींद्र (गुजरात) हे इतिहासकालीन थोर गाणपत्य आहेत.

(३) दत्त संप्रदाय : दत्त संप्रदाय इसवी सनाच्या चौदाव्या शतकात अस्तित्वात आला. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन दैवतांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण दत्तात्रेय देवतेत झाले. हा समन्वय इ.स.च्या दहाव्या शतकात झाला असावा, त्याआंधी महाभारत आणि मार्कंडेय पुराणात त्याची विविध वर्णने आढळतात. विष्णूने दत्तावतार घेतला. शिव हे दत्ताचे गुरू आहेत. इ. समजुतीही प्रचलित आहेत. त्यांना ब्रह्म पुराणाचा आधार सांगितला जातो. पुराणात भार्गव, परशुराम, अलर्क, कार्तवीर्य, सहस्त्रार्जुन, प्रल्हाद, यदू आणि आयु हे दत्तात्रेयाचे शिष्य असल्याचे म्हटले आहे. तसेच दासोपन्त वल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी आणि माणिक प्रभू या इतिहासकालीन सत्पुरुषांना दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.

महाराष्ट्रात दत्तोपासनेला प्रारंभ महानुभाव संप्रदायाने केला. त्यांच्या दृष्टीने दत्त ही एकमुखी चतुर्भुज देवता आहे. बाराव्या शतकापासून भारतात सूफी संप्रदायाचे प्राबल्य वाढू लागले. अनेक हिंदू पीराला नवस करून त्याची पूजा करू लागले. या पार्श्वभूमीवर वल्लभ (इ.स. १३२० -१३५०) यांना दत्तात्रेयाचे पहिले अवतार म्हणतात. त्यांच्यानंतर नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८ – १४५८) यांनी दत्तोपासनेला संघटित रूप देऊन ‘दत्त संप्रदाय प्रवर्तित केला. ‘गुरुचरित्र’ या संप्रदायाच्या प्रमाण ग्रंथामध्ये या दोघांना दत्ताचे अवतार म्हटले आहे. मूळामध्ये परंपरेने जो ‘गुरुमार्ग’ चालत आला होता त्यालाच दत्त संप्रदाय असे म्हटले जाते.

दत्त संप्रदायाचे प्राबल्य प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आजही दिसून येते. माहूर ( दत्तात्रेयाचे शयनस्थान) लाड कारंजे ( नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान) “औदुंबर’ नरसोबाची वाडी (नरसिंह सरस्वतींचे १२ वर्षे वास्तव्यस्थान) गाणगापूर (नरसिंह सरस्वतींनी पूजिलेल्यादत्त पादुका) ही दत्त सांप्रदायिकांची प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. ‘काही प्रमुख दत्तोपासकांमध्ये सरस्वती गंगाधर, जनार्दन स्वामी, एकनाथ, मुक्तेश्वर, दासोपंत, निरंजन रघुनाथ, नारायण महाराज जालवणकर, माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, आदींचा समावेश होतो.

(४) समर्थ संप्रदाय : या संप्रदायाचे प्रवर्तक रामदास स्वामी (इ.स. १६०८ – १६८१) आहेत. त्यांनी विष्णूचा कृष्णासारखाच दुसरा प्रभावी अवतार *राम’ हे उपास्य दैवत केंद्रस्थानी धरून समर्थ संप्रदायाचे प्रवर्तन केले. सतराव्या शतकातील प्रतिकुल राजकीय, पारमार्थिक आणि सामाजिक परिस्थिती या संप्रदायाचे कारण ठरली. हा संप्रदाय आदिनारायण – महाविष्णु – हंस – ब्रह्मदेव – वशिष्ठ – रामचंद्र-रामदास अशी गुरू परंपरा मानतो. या संप्रदायात प्रभु रामचंद्रांबरोबर हनुमान आणि तुळजा भवानी या उपास्य देवतांची उपासना केली जाते. पंचवटी आणि टाकळी (नाशिक), अयोध्या (उत्तर भारत), रामेश्वर (दक्षिण भारत), जांब (मराठवाडा), चाफळ, शिवथर घळ, शिंगणवाडी, दहिफळ, परळी आणि सज्जनगड (सातारा परिसर) ही या संप्रदायाची पवित्र तीर्थस्थाने आहेत.

रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अकरा मारुतींची स्थापना करून बालोपासनेचा प्रसार केला. त्याचप्रमाणे त्यांनी ११०० मठ स्थापन करून आपल्या कार्याला भक्कम अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांचे मठपती हे धर्म आणि लोकशिक्षणाचे प्रभावी काम करीत असत.

“दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ असून त्यात संप्रदायाचे तत्त्वज्ञान सविस्तर मांडलेले आहे. ‘पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान’, “अविनाश ते ब्रह्म सगुण’, नासे ते माया सगुण’, इत्यादी अनेक सूत्रांमधून हे तत्त्वज्ञान स्पष्ट होते. आपल्या अनुयायांनी सदगुरू करून सगुणभक्‍ती आणि निर्गुणोपासना करावी, कर्मयोग स्वीकारून महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा प्रकारचा साधना मार्ग रामदासांनी सांगितला आहे.

संदर्भ : यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ पुस्तक HIS285-2

Leave a Reply

Your email address will not be published.