महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

फार प्राचीन काळापासून वास्तुशिल्प हे आपल्या सामर्थ्याचे आणि त्या सामर्थ्याच्या चिरंतन अस्तित्वाचे मूर्त आहे अशाच भावनेने सगळीकडच्याच सत्ताधीशांनी भव्य अशा वास्तूंची उभारणी केली. राजप्रासाद, दुर्ग, मंदिरे, प्रार्थनामंदिरे, स्मारके अशा विविध रुपाने वास्तुशिल्प प्रगट झालेळे आहे. सत्ताधीशांचा आणि धनिकांचा उत्तम आश्रय लाभल्याने प्राय: सर्वच देशात आणि सर्वच काळात या कलेचा परिपोष झाला. मात्र राजप्रासाद, हवेल्या या वैयक्तिक मालकीच्या असल्याने मालकाबरोबर किंवा घराण्याबरोबर त्या लयाला गेलया. 

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

स्तूप, मंदिरे अशासारख्या धार्मिक स्वरुपाच्या वास्तूंना धर्माचा म्हणजे पर्यायाने समाजाचा आधार व आश्रय लाभलेला असल्याने त्यांचे जतन झाले, जीर्णोध्दार झाला. यापैकी बर्‍याच प्राचीन वास्तू आजही बऱ्यावाईट अवस्थेत तग धरून आहेत. त्याचा अप्रत्यक्ष  परिणाम असा झाला की वास्तुशिल्प म्हणजे मंदिरशिल्प, धार्मिक स्वरूपाच्या इमारती अशी समजूत रुढ झाली. जे प्राचीन वास्तूंबाबत तेच मध्ययुगीन वास्तूंबद्दलही झाले. सुलतानांचे राजप्रासाद, सरदार-दरकदार यांच्या हवेल्या बहुतेक ठिकाणी नामशेष झाल्या. परंतु त्यांची थडगी, त्यांनी बांधविलेल्या मशिदी शिल्लक गहिल्या. नागरी स्वरुपाच्या शिल्पाची कल्पना तत्कालीन वाड्मयीन वर्णने आणि क्वचित कोठे शिल्लक असणारे अवशेष यावरुनच बांधावी लागते.

मध्ययुगीन सल्तनतीचा पाया दौलताबादेला घातला असला तरी थोड्याच काळात सुलतानांनी राजधानी महाराष्ट्राबाहेर, गुलबर्गा येथे हलवली. मंतर बिदर येथे गेली. पुढे एकाच्या पाच सल्तनती झाल्या आणि एलिचपूर, अहमदनगर, बिदर, विजापूर आणि गोवळकोंडा या राजधान्या झाल्या. पैकी बिदर, विजापूर आणि गोवळकोंडा येथे मोठ्या प्रमाणावर न्नांथकाम झाले. विशेषत: आदिलशाही ब कुतुबशाही घराण्यांनी प्रेक्षणीय वास्तू उभारल्या. इमादशाही व निजामशाही यांची सांपत्तिक स्थिती आणि राजकीय जीवन भव्य वास्तुकामाच्या निर्मितीला पोषक नव्हते. तरीही त्यांच्या वास्तुशिल्पाचे ही काही अवशेष शिल्लक आहेत. त्यावरून गुणवत्तेच्या बाबतीत येथील शिल्पकार फारसे मागासलेले नव्हते – किंबहुना चांगले वाकबगार असावेत असे दिसते. तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे अंग म्हणूनही या बास्तुशिल्पाचा परिचय आवश्यक ठरतो.

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

वास्तुशिल्पाची अगदी प्राथमिक पायरी म्हणजे नगररचना. भारतीय वास्तुशास्त्रात नगररचनेचे तपशीलवार नियम ग्रथित केलेले होते. तशाच प्रकारे इस्लामी विचारवंतानी आदर्श नगरसंयोजन कसे असावे याविषयी काही कल्पना मांडलेल्या आहेत. नव्या नगराची उभारणी करावयाची असेल तर नियोजित क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारच्या सामूहिक प्रार्थनेची ‘जामी मशीद* उभारणे हे आद्य कर्तव्य ठरते. ही नगराची अत्यावश्यक वास्तू. पुढे तीच, मध्यबिंदूच्या ठिकाणी कल्पून तिच्याभोवती मद्रसे (पाठशाला) राजप्रासाद, सरकारी कार्यालये असावीत. या इमारती याच क्रमाने जामी मशिदीपासून दूरदूर असाव्यात. त्या पलिकडे बाजार, त्याच्याही पलिकडे कारागिरांची वस्ती ठेवण्यात यावी. 

साधारण नागरिकांची घरे या सगळ्यांपासून अलग, रोजच्या व्यवहाराला पुरेसा आडोसा राहील अशा बेताने वसवावीत. पडद्याची चाल असल्यामुळे असा अलगपणा आवश्यक होता. अहमदनगरसारखी दोनतीन शहरे नन्याने बसविण्यात आली तर इतर ठिकाणी जुन्याच नगराची वाढ करण्यात आली. स्वाभाविकच अशा नगरांमधे आमूलाग्र बदल करणे अशक्य होते. नव्या नगरांची रचना कशी झाली ते आज कळणे अशक्य झाले आहे कारण गेल्या दीडशे वर्षात इतके बदल झाले आहेत की ”हेच जुने गाव” असा निर्वाळा देणे अवघड झालेले आहे. तरीही वाड्मयीन वर्णने आणि काही अवशेष यांच्या साहाय्याने मध्ययुगीन नगररचना कशी होती याची आणि परंपरागत इस्लामी संकल्पनांशी ती कितपत मिळती जुळती होती याचे विवेचन पुढे केळे आहे.

मध्ययुगीन नगरात आणि थोड्या मोठ्या खेडेगावात हमखास आढळणारी एक गोष्ट म्हणजे गावाभोवतीची तटबंदी-साधारण कमरेइतक्या उंचीपर्यंत दगडाची, त्याच्यावर बारा ते पंधरा फूट इतक्या उंचीची पक्क्या वा कच्च्या विटांची भिंत उभारण्यात येई. दरवाजे पूर्ण दगडी बांधणीचे, कमानदार असत. कित्येक ठिकाणी तटबंदी जमीनदोस्त झाली आहे पण दरवाजे-म्हणजे त्याभोवतीची गोपुरे-शिल्लक आहेत. दरवाजा, त्याच्या आत रखवालदारांसाठी खोल्या, वरच्या बाजुला गॅलरी अशी रचना असे. निजामशाही सरदार सलाबतखान याने तिसगाव या गावाभोवती बांधलेल्या तटबंदीची गोपुरे अलिकडेपर्यंत चांगल्या अवस्थेत होती आणि तत्कालीन वास्तुशिल्पाचे उत्तम नमुने म्हणता येण्यासारखी होती.

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

मध्ययुगीन सल्तनतीच्या नगर संयोजनाची पहिली ओळख होते ती देवगिरी-दौलताबाद येथे. अल्लाउद्दीन खलजीच्या स्वारीच्या वेळी देवगिरीभोवती तटबंदी बांधून झालेली नव्हती असे फेरिश्त्याने नमूद केले आहे. खलजींच्या काळात नगराच्या रचनेत काही बदल  झाल्याची नोंद नाही. महंमद तघलकाने राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबादेला आणली. त्यानंतर काही बांधकाम सुरू झाले असावे परंतु साडेतीन वर्षातच राजधानी परत  दिल्लीला गेल्यामुळे नगराची रचना अर्धवटच सोडण्यात आली असावी. मात्र इ. स. १३८९ मधे म्हणजे महंमद तघलकानंतर पन्नासच वर्षानी एका अरब प्रवाशाने तूघलकाच्या दौलताबादेचे वर्णन लिहून ठेवळे आहे. 

समाजातील प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पेठ असावी अशी योजना होती-सैनिकांसाठी एक, वजिरांसाठी एक, कारभार्‍यांसाठी एक, काझी आणि उलेमा यांच्यासाठी एक आणि दरवेशी, सूफी यांच्यासाठी वेगळी-प्रत्येक पेठेत मशिदी, बाजार, हमाम, पिठाच्या चक्क्या, भटारखाने अशा अत्यावश्यक गोष्टींची तरतूद केलेली होती. शिवाय व्यापारी, कारागीर, सोनार, लोहार अशांच्या राहण्याची सोय केलेली होती. खरेदी-विक्री यासाठी कोणालाही आपल्या पेठेतून उठून दुसर्‍या पेठेत जाण्याची गरज पडू नये अशासाठी ही योजना होती. त्यामुळे प्रत्येक पेठ म्हणजे जणू काही एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण नगरच होते”. ही योजना प्रत्यक्षात उतरलेली नसली तरी चौदाव्या शतकामधे शासंकांच्या मनात नगररचनेविषयी काय कल्पना होत्या ते यावरून समजू शकते. 

या योजनेची इस्लामी नगररचनेच्या संकल्पनेशी तुलना केली तर योजकांच्या विचारसरणीतील किंवा त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीतील वेगवेगळेपणा स्पष्ट होतो. मध्यवर्ती म्हणता येथील अशा ठिकाणी जामी मशीद आधीच तयार झालेली होती. परंतु बाकी तपशील-मुख्यत: वस्तीच्या पेठवार विभागणीचा तपशील बराचसा निराळा दिसतो. तघलकाच्या संयोजकांनी, व्यवसायवार विभागणी केलेली आहे. ही गोष्ट प्राचीन भारतीय परंपरेनुसार झाली.

बहमनींच्या काळात तसेच निजामशाहीत दौलताबादच्या वस्तीत आणि आकारात मोठीच वाढ झाली. डोंगराच्या माथ्यावर फारशा वस्तीला जागाच नव्हती, यादव काळात आणि नंतर बहमनींच्या काळात वस्ती होती ती डोंगराच्या पायथ्याशी, पूर्वबाजूला. याच भागाला आज ‘महाकोट’ म्हणतात. महाकोटाच्या सर्व बाजूला खंदक आहेत. खंदकांना लागून तटबंदी आहे आहे आणि तटबंदीच्या आतल्या बाजूला, लागूनच सलग स्स्ता आहे. वस्तीमधे, पूर्वपश्चिम व उत्तरदक्षिण असे, एकमेकांना काटकोनात छेदणारे दोन दोन रस्ते आहेत. रस्त्यांची रुंदी शक्‍यतो सारखी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती चार मीटर एवढी. यांना समांतर पण रुंदीने लहान असे उपरस्तेही होते . निजामशाहीमधे वस्ती वाढल्यामुळे महाकोटाच्या बाहेर वसाहत वाढू लागली. मलिक अंबरने या वस्तीभोवती कोट घातला आणि त्यामुळे या नव्या वस्तीला ‘अंबरकोट’ म्हणू लागले. ही नवी वस्ती महाकोटाच्या बाहेर पण पूर्व-उत्तर-दक्षिण अशा बाजूंना होती. 

इमादशहांनी एलिचपूर येथे राजधानी केली. महाराष्ट्राच्या उत्तरसीमेच्या अगदी नजीक असे हे गाव, आज त्याच्या मुसलमानपूर्व नावाने ‘अचलपूर’ म्हणून ओळखले जाते. यादवांच्या काळात अचलपूर हे प्रादेशिक शासनाचे केंद्र होते, येथेच अल्लाउद्दिनने दोन दिवस मुक्काम केला होता आणि यादव सुभेदाराचा पाहुणचार घेऊन देवगिरीवरील हल्लयाला रवाना झाला होता. एके काळी या गावाचा आकार बराच मोठा होता, गावात चाळीस हजार उंबरे होते अशी आख्यायिका आहे. आजमितीला कसेबसे दीडदोन हजार असतील. नगररचनेच्या दृष्टीने अचलपूराची माहिती उद्बोधक ठरते. गावाचे अकरा विभाग असून प्रत्येक भागाला त्या त्या भागाच्या पाटलाच्या नावावरून ओळखतात. या भागांना ‘खेल’ असे स्थानिक नाव आहे, आणि विभाग-नाबे, ‘खेल-जपमाळी’ ‘खेल-त्रिंबक-नारायण’ अशासारखी आहेत. या पेठांचे पूर्वी चोपन्न उपविभाग होते, आता पस्तीस शिल्लक आहेत. हे उपविभाग, ते ते विभाग वसविणाराच्या किंवा त्याच्या कारभार्‍याच्या नावाने ओळखले जातात, जसे सुलतानपुरा, अन्वरपुरा, नसीबपुरा इ. मात्र हे ‘पुरे’ जाती किंवा व्यवसाय यानुरूप वसविलेले असावेत असे दिसत नाही तसेच त्यांच्या वसाहतीचा कालक्रमही सांगता येत नाही.

बहमनींच्या काळात महत्त्वाचे सरकारी ठाणे असणारे दुसरे गाव म्हणजे ‘जुन्नर’ “ही फार मोठी व्यापारी पेठ होती आणि सातवाहन कालापासून प्रसिध्द होती. कोकणातून देशावर येण्याच्या रस्त्यावरचे हे नाक्‍याचे ठाणे असल्याने सल्तनतींच्या काळीही ते मुलकी व  लष्करी ठाणे होतेच. या गावाची वस्ती पस्तीस भागात विभागलेली होती आणि या भागांना ‘पुरा’ किंवा “वाडा’ म्हणत. येथे मात्र या पेठा व्यवसाय व जाती यांच्या आधारावरच वसलेल्या दिसतात. आज त्यांना सय्यदपुरा, मन्सूरपुर अशी नावे असली तरी आणि हे ‘पुरे सल्तनतींच्या काळातले असले तरी इतर पेठा पूर्वीच्या काळातील होत्या. 

सगळ्यात महत्त्वाचे ठरलेले शहर म्हणजे अहमदनगर. अहमद निजामशाहाचे मूळ ठाणे जुत्रर येथे होते. परंतु दौलताबादेचे ठाणे ताब्यात आणण्यासाठी किंवा त्याच्यावर दबाव ठेवण्यासाठी त्याच्या जवळ आपले ठिकाण असले पाहिजे असे ठरवून अहमदशाहाने सध्याच्या अहमदनगरची निवड केली. इतर बहुतेक मध्ययुगीन नगरांप्रमाणे या नगराच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की सुलतान शिकारीला गेला असताना, या ठिकाणी कोल्हा उलटून शिकारी कुत्र्यांच्या अंगावर धावून गेला तो या जागेचा गुण आहे असे समजून सुलतानाने हे ठिकाण निवडले. वस्तुत: या जागेची निवड त्याने अतिशय विचारपूर्वक, संरक्षणाला उपयुक्त, वस्तीला योग्य म्हणून केलेली होती. उत्तेकंडे व ईशान्येकडे जेञूर- पिंपळगाव टेकड्या होत्या म्हणजे त्या दिशेने येणार्‍या सैन्याला (शत्रूला) घाटातच गाठता येण्यासारखे होते. 

दक्षिणेकडेही डोंगरांची रांग होती आणि डोंगरमाथा धरून ठेवला तर तिकडूनही शत्रूला अडवता येण्यासारखे होते. या जागेचा दुसरा गुण असा की ती खोलगटात असल्याने भोवतालच्या उंचवट्यावरून पाणी वाहून आणणे सोपे होते. नगर शहराचा सल्तनतीच्या काळातला विस्तार कसकसा होत गेला हे पाहिले तर या गोष्टीचे महत्त्व ध्यानात येते. अगदी सुरवातीला, आज *माळीवाडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आणि नालेगाव या नदीच्या जवळच्या भागात वस्ती होती. ही वस्ती वाढत गेली ती माळीवाड्याच्या ईशान्येच्या दिशेने. अहमद निजामशाहाच्याच काळात ख्रिस्त आळी, वेहरामपुरा. शाहगंज, हातीमपुरा इकडे वस्ती झाली व ईशान्येच्या दिशेने वाढत गेली. या प्रत्येक पुऱ्यासाठी नळातून पाणी आणण्यात आले. लोकवस्ती वाढत गेली तशा पेठा पश्चिमेकडे सरकत सीना नदीच्या काठापर्यंत गेल्या. जामी मशीद, मदरसा, राजप्रासाद ही सगळी एकमेकाच्या आसपास होती-ती अगदी पश्चिमेच्या बाजूला. शहराभोवती तटबंदी होती, आता फक्त दरवाजे शिल्लक आहेत. आजच्या विधानावरून निजामशाही नगराचे विधान कसे होते हे सांगणे अवघड आहे. फक्त, ज्या ज्या ठिकाणी या काळात बांधलेल्या पाण्याचे नळ पोचले आहेत तेथे मोठ्या लोकांचे प्रासाद किंवा दाट वस्ती असावी एवढेच सांगता येते.

नगररचनेसंबंधी सामान्य निष्कर्ष एवढाच काढता येतो की, नगराचे आवश्यक भाग म्हणून जामी मशिदीसारख्या इमारती सोडल्या तर इस्लामी संकल्पनेचे पालन कोणा मध्ययुगीन सुलतानांनी केल्याचे दिसत नाही. यांचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आधी वस्ती असणार्‍या ठिकाणीच आपली राजधानी किंवा ठाणे वसविले. त्यांना नगरविस्तार करता आला पण नवनिर्मितीला वाव थोडा होता. दुसरीही एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागते, सल्तनतींच्या अस्ताबरोबर यापैकी बहुतेक ठिकाणी उतरती कळा लागली आणि विसाव्या शतकात अहमदनगरसारख्या ठिकाणी झालेली वस्तीची वाढ अशा पध्दतीने झाली की त्यामुळे जुना चेहणमोहरा पुसून गेला आहे.

नगरांइतकेच किंबहुना काही दृष्ट्या सल्तनतींनी जास्त महत्त्व दिले ते दुर्गरचनेला. शिवकाळात प्रसिध्दीला आलेल्या बर्‍याच किल्यांची उभारणी बहपनी वा निजामशाही यांनी केली. सगळ्या किल्यांची माहिती घेणे अशक्य आणि अनावश्यक आहे म्हणून एका डोंगरी आणि एका भुईकोट किल्याचे थोडे तपशीलवार वर्णन पुढे केले आहे. डोंगरी किल्ला म्हणजे दौलताबाद. यादवकालात देवगिरीच्या डोंगराच्या माथ्यावर राजप्रासाद व निकटचे , सेवक अशा अगदी मोजक्या लोकांची वस्ती होती. शिवाय डोंगराच्या बरगड्यात हिंदू व जैन लेणीही खोदलेली होती. मुख्य वस्ती डोंगराच्या पायथ्याशी, आज ‘महाकोट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात होती आणि अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीच्या वेळी याही भागाभोवती तटबंदी बांधून पुरी झाली नव्हती असे फेरिश्ता सांगतो हे वर सांगितलेले आहे.”

उत्तर-दक्षिण मार्गावर, विशेपत: बेरूळच्या घाटाच्या टोकावर हा डोंगर असल्याने त्याची जागा लष्करी दृष्टया मोक्याची होती. शिवाय हा डोंगर इतर रांगेपासून फटकून निखून स्वतंत्र उभा राहिला होता, याची तटबंदी करणे सोपे होते. बहुधा बहमनी काळाच्या पूर्वार्धात, किंबहुना सुरवातीलाच दोन गोष्टी करण्यात आल्या. नगराभोवतालच्या अपूर्ण अवस्थेतील यादव तटबंदीच्या ऐवजी / जागी दुहेरी रांगाचा, अर्धगोल बुरूजांचा तट उभारण्यात आला.

 दक्षिणेच्या आणि उत्तरेच्या बाजूने वाहत जाणारे ओढे रुंद व खोल करून या तटांबाहेर खंदक तयार करण्यात आला आणि खंदकाबाहेर भराव टाकून उंचवटा  तयार करण्यात आला. त्यामुळे खंदकाकडे येणारे शत्रूसैनिक, तटावरून लगेच दिसू शकतात, कोणाला गुप्तपणे तेथपर्यंत पोचणे अवघड होते. दुसरे म्हणजे देवगिरीच्या डोंगशभोवतीचा पायथ्याचा भाग खणून काढून नव्वद फूट उंचीची खडी दरड तयार करण्यात आली. ही तयार करीत असताना यादवकालात तयार झालेल्या दोन गुंफाही कापून काढण्यात आल्या. त्यांचा उरलेला भाग या दरडीच्या पूर्वकडे असलेल्या भागात आजही स्पष्ट दिसतो. केवळ दरड खडी करूनच काम भागले नाही, तिच्या पायाशी तीस फूट खोल आणि पन्नास फूट रुंद असा खंदक तयार करण्यात आला. यात पाणी आणण्यासाठी उत्तरेकडील टेकड्यांवरून नळ घातले. डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी एक बोगद्याचा जिना करण्यात आला-याशिवाय वर जाण्याला मार्ग नाही. इतके झाले तरी डोंगरमाथा हा संकटकाळी वस्तीचा ही जाणीब कायमच होती आणि म्हणून महाकोटाची तटबंदी मजबूत आणि तंदुरुस्त राखण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *